गोकुळाष्टमीला चूकनही करुन नका 'ही' कामे, नाही तर भगवान श्रीकृष्णाचा होईल प्रकोप
Janmashtami 2024 : श्री कृष्ण जन्माष्टमी म्हणजेच गोकुळाष्टमी हा हिंदूंचा एक प्रमुख सण आहे, जो भगवान कृष्णाची जयंती म्हणून साजरा केला जातो. हिंदू दिनदर्शिकेनुसार भाद्रपद महिन्यातील अष्टमी तिथीला हा सण साजरा केला जातो. हा दिवस विशेषत: कृष्ण भक्त पूजा, भजन, कीर्तन आणि उपवासाने साजरा करतात.
जुलमी कंसाचा अंत करून धर्माची स्थापना करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. त्याच्या जन्मदिवशी दहीहंडीच्या स्पर्धांचेआयोजनकेले ज्या जे श्रीकृष्णाच्या बालपणीच्या मनोरंजनाचे प्रतीक आहेत. या दिवशी उपवास, व्रत केल्यास भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. पण अशा काही गोष्टी आहेत ज्या या दिवशी केल्या तर भगवान श्रीकृष्ण प्रसन्न होण्याऐवजी तुमच्यावर नाराज होऊ शकतात.

जन्माष्टमीच्याअर्थातच गोकुळाष्टमीच्या दिवशी भक्त भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी विविध प्रकारचे विधी आणि पूजा करतात. या दिवशी उपवास केल्याने शारीरिक आणि मानसिक शुद्धी होते, जे ईश्वराच्या भक्तीचे प्रतीक आहे. भगवान श्रीकृष्ण त्यांचे आवडते भजन आणि कीर्तन गाऊन प्रसन्न होतात. लोणी आणि साखरेची मिठाई देऊन त्यांचे बालस्वरूप तृप्त होते. या दिवशी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. त्या गोष्टी केल्याने श्रीकृष्ण तुमच्यावर क्रोधित होऊ शकतात.
जर तुम्हाला भगवान श्रीकृष्णाचा आशिर्वाद प्राप्त करायचा असेल तर तुम्ही पुढील काही कृती टाळल्या पाहिजेत जेणेकरुन श्रीकृष्ण तुमच्यावर प्रसन्न होतील.
मांसभक्षण, तामसिक आहार घेऊ नये
या दिवशी मांस, मद्य आणि तामसिक अन्नाचे सेवन करू नये. कारण त्यांचा शारीरिक आणि मानसिक शुद्धतेवर परिणाम होतो.
नकारात्मक विचारांपासून दूर राहा
राग, अहंकार आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहिले पाहिजे कारण ते मनःशांती आणि भक्तीमध्ये बाधा आणतात.
गाईला त्रास देऊ नये
जन्माष्टमीच्या दिवशी गाईला त्रास देऊ नये कारण श्रीकृष्ण स्वतः गोपालक होते आणि त्यांनी गाईच्या सेवेला खूप महत्त्व दिले होते. माता गाईला आदराने आणि प्रेमाने वागवले पाहिजे आणि तिला कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा हानी पोहोचवू नये.
महिलांनी घ्यावी ही काळजी
असेही मानले जाते की या दिवशी केस मोकळे सोडल्याने नकारात्मक ऊर्जा आकर्षित करू शकतात, ज्यामुळे पूजा आणि भक्तीमध्ये व्यत्यय येऊ शकतो. भारतीय परंपरेत केस बांधणे हे पवित्रता आणि शिस्तीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे विशेषतः या दिवशी महिलांनी आपले केस बांधून ठेवावेतअसेही सांगितले जाते.












Click it and Unblock the Notifications