Chandra Grahan 2025 : चंद्रग्रहण काळात गर्भवती महिलांनी काय काळजी घ्यावी, नियम काय आहेत?

Chandra Grahan 2025 : ७ सप्टेंबर २०२५ रोजी वर्षातील दुसरे चंद्रग्रहण होत आहे. हे ग्रहण रात्री ९:५८ वाजता सुरू होऊन पहाटे १:२६ पर्यंत असेल आणि ते भारतात दिसणार असल्याने, लोकांच्या मनात अनेक शंका निर्माण झाल्या आहेत.

हिंदू धर्मानुसार ग्रहण हा काळ अशुभ मानला जातो. या काळात कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य केले जात नाही. गर्भवती महिलांसाठी तर हा काळ विशेष संवेदनशील मानला जातो.

Chandra Grahan 2025

गर्भवती महिलांसाठी चंद्रग्रहण खरंच धोकादायक आहे का?

अनेक जुन्या परंपरांनुसार, चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये. जर त्या बाहेर गेल्या, तर जन्माला येणाऱ्या बाळाच्या शरीरावर काहीतरी चुकीचा परिणाम होऊ शकतो, असे मानले जाते.

यामागे कोणताही वैज्ञानिक पुरावा नसला तरी, खबरदारी घेणे महत्त्वाचे मानले जाते. या काळात वातावरणात उष्णता वाढते, जी गर्भाशयात वाढणाऱ्या बाळासाठी हानिकारक असू शकते.

गर्भवती महिलांनी काय करू नये?

  • धारदार वस्तूंचा वापर टाळा : कात्री, सुई, चाकू यांसारख्या धारदार वस्तू वापरणे टाळावे.
  • झोपणे, खाणे किंवा पाणी पिणे टाळा : ग्रहण काळात झोपणे, खाणे आणि पाणी पिणे निषिद्ध मानले जाते.
  • बाहेर जाणे टाळा : घराबाहेर पडू नका आणि थेट चंद्राकडे पाहू नका.
  • नकारात्मकता टाळा : नकारात्मक विचार, भांडणे किंवा तणावापासून दूर राहा.

गर्भवती महिलांनी काय सावधगिरी पाळावी?

  • मंत्र जप करा: ग्रहण काळात देवाचे स्मरण करणे आणि मंत्र जप करणे अत्यंत शुभ मानले जाते.
  • स्नान करा आणि शुद्धीकरण करा : ग्रहण सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यानंतर स्नान करून स्वच्छ कपडे घाला.
  • तुळशीचा वापर करा : ग्रहण काळात अन्न आणि पाण्यात तुळशीची पाने टाकण्याची परंपरा आहे, जेणेकरून अन्न अशुद्ध होऊ नये.
  • हलके अन्न घ्या : जर ग्रहण जास्त वेळ असेल तर उपाशी राहण्याऐवजी हलके अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. हलके अन्न शरीराला ऊर्जा देईल आणि जास्त उष्णता निर्माण करणार नाही.

या मंत्रांचा जप करा?

गर्भवती महिला मानसिक शांतता आणि बाळाच्या संरक्षणासाठी खालील मंत्रांचा जप करू शकतात:

ॐ नमः शिवाय

ॐ नमो भगवते वासुदेवाय

ॐ दुर्गेय नमः

ॐ चंद्राय नमः

या मंत्रांमुळे मानसिक स्थिरता, शांती आणि नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण मिळते.

ग्रहणानंतरची खबरदारी काय घ्यावी?

ग्रहण संपल्यानंतर लगेच स्नान करा आणि गंगाजल किंवा पवित्र पाण्याने घर शुद्ध करा. गर्भवती महिलांनी ताजे आणि शुद्ध केलेले अन्न खावे, आणि देवांना अर्पण केल्यानंतरच खाण्याची परंपरा आहे. ही सर्व खबरदारी घेऊन गर्भवती महिला स्वतःला आणि आपल्या बाळाला सुरक्षित ठेवू शकतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+