विराट कोहलीने निवृत्ती का घेतली?, स्वत:च केला मोठा खुलासा; म्हणाला- दर 4 दिवसांनी केस काळे...!
Virat Kohli : विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती का घेतली, यावर त्यांनी पहिल्यांदाच खुलेपणाने भाष्य केले. विराटने लंडनमध्ये एका कार्यक्रमात त्यांची भूमिका स्पष्ट केली.
विराटने लंडनमधील एका कार्यक्रमात सांगितले की, वाढत्या वयामुळे त्याला हा निर्णय घ्यावा लागला. विराट 36 वर्षांचा आहे. त्याने 12 मे 2025 रोजी सोशल मीडियावर पोस्टद्वारे कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती.

लंडनमध्ये कोणत्या कार्यक्रमाचे होते आयोजन?
माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने त्याच्या 'YouWeCan' फाउंडेशनसाठी लंडनमध्ये एका डिनर पार्टीचे आयोजन केले होते. कोहलीसह जगभरातील क्रिकेट आणि इतर क्षेत्रातील लोकांनी या पार्टीला हजेरी लावली होती.
जेव्हा टीव्ही प्रस्तुतकर्ता गौरव कपूर यांनी विराटला प्रश्न केला की, लोक मैदानावर त्याची आठवण काढतात, त्याने अचानक निवृत्ती का घेतली, त्यावर विराट हसला आणि म्हणाला, 'मी दोन दिवसांपूर्वीच माझी दाढी रंगवली. जेव्हा तुम्हाला दर चार दिवसांनी दाढी रंगवावी लागते, तेव्हा तुम्हाला समजते की आता आपली वेळ आली आहे.
कोहलीने 123 कसोटी सामने खेळले
कोहलीची कसोटी कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे, ज्यामध्ये त्याने 123 कसोटींमध्ये (210 डाव) 46.85 च्या सरासरीने 9,230 धावा केल्या. या दरम्यान, त्याने 30 शतके आणि 31 अर्धशतके केली.
त्याने 68 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केले आणि 40 सामन्यांमध्ये विजय मिळवला. त्याची विजयाची टक्केवारी 58.52 आहे, जी 50 किंवा त्याहून अधिक कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व करणाऱ्यांमध्ये तिसरी सर्वोत्तम आहे.
कसोटींमध्ये विराट धोनी आणि रोहित शर्माच्या पुढे
कसोटींमध्ये विराट कोहलीने कर्णधार म्हणून कोणतीही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. कसोटी क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून तो महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा दोघांच्याही पुढे आहे. कोहलीने घरच्या मैदानावर सर्व 11 मालिका जिंकल्या. धोनी आणि रोहित दोघांच्याही नेतृत्वाखाली टीम इंडियाला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभवाचा सामना करावा लागला. रोहितच्या कर्णधारपदात न्यूझीलंडविरुद्ध क्लीन स्वीपचाही समावेश आहे.
2015 मध्ये कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर पहिल्यांदाच नेतृत्व केले. भारताने ४ कसोटी सामन्यांची मालिका ३-० अशी जिंकली. त्यानंतर, कोहलीच्या नेतृत्वाखाली, संघाने भारतात खेळल्या गेलेल्या सर्व कसोटी मालिका जिंकल्या.












Click it and Unblock the Notifications