Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Who is Abhimanyu Iswaran 27 शतकं, 31 फिफ्टी ठोकणाऱ्या अभिमन्यूची टिम इंडियात होऊ शकते एंट्री कोण आहे

Who is Abhimanyu Iswaran : भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारताने पहिली कसोटी गमावली आणि दुसरी जिंकली. तिसऱ्या कसोटीत भारत आघाडी घेऊ शकला नाही आणि भारतीय फलंदाजांच्या ढिसाळ कामगिरीमुळे सामना गमवावा लागला. आता भारतीय संघात मोठा बदल होण्याचे संकेत आहेत. टीम इंडियात आता एक असा फलंदाज एंट्री करण्याची शक्यता आहे, ज्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित करुन टाकले आहे.

भारतीय संघात जवळपास दोन बदल निश्चित असल्याचे मानले जात आहेत. त्यातील पहिला बदल म्हणजे करुण नायरला डच्चू मिळण्याचे संकेत आहेत. त्यात पहिल्या जागी साई सुदर्शनचा समावेश होऊ शकतो. साई सुदर्शनने इंग्लडविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला होता, पण दुसऱ्या सामन्यात त्याला डच्चू मिळाला, आता चौथ्या कसोटी सामन्यात त्याचे पुनरागमन शक्य आहे.

Who is Abhimanyu Iswaran

दुसरीकडे अभिमन्यू इश्वरन याचा भारतीय संघात समावेश होऊ शकतो. त्याची एंट्री जर झाली तर भारताच्या विजयाच्या आशा अधिक पल्लवीत होतील कारण या खेळाडूकडे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये दीर्घ खेळण्याचा अनुभव आहे आणि तिथे त्याने धमाकेदार कामगिरी केली आहे. आज आपण अभिमन्यू इश्वरन याच्याबद्दल माहिती जाणून घेऊया.

Take a Poll

कोण आहे अभिमन्यू इश्वरन्..?

अभिमन्यू ईश्वरनहा एक भारतीय क्रिकेटपटू आहे जो तामिळ असून बंगालकडून खेळतो. तो उजव्या हाताचा सलामीवीर फलंदाज आहे. त्याने दुलीप ट्रॉफीमध्ये इं डिया अ , आणि इंडिया ब आणि रणजी संघात बंगालचे नेतृत्व केले आहे.

२७ शतकं, ३१ अर्धशतकं

अभिमन्यू ईश्वरनचा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. १०३ सामने खेळल्यानंतर, ईश्वरनने ७८४१ धावा केल्या आहेत. सर्वात खास गोष्ट म्हणजे त्याच्या बॅटमधून २७ शतके निघाली आहेत. याशिवाय ३१ अर्धशतकांच्या डावांमध्येही तो दिसला आहे. लिस्ट ए मध्ये त्याच्याकडे ९ शतके आणि २३ अर्धशतकांच्या डाव आहेत. अशा परिस्थितीत, तो कसोटी संघात पदार्पणाचा दावेदार आहे.

दहाव्या वर्षी क्रिकेटचे धडे घेण्यासाठी कोलकात्याला गेले

अभिमन्यूचा जन्म ६ सप्टेंबर १९९५ रोजी देहरादून येथे त्याचा जन्म झाला. त्याचे वडिल तमिळ आणि आई पंजाबी आहे. त्याने कोलकात्यातील उमेश चंद्र कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. त्याच्या सुरुवातीच्या काळात, त्याचे चार्टर्ड अकाउंटंट असलेले वडील रंगनाथन परमेश्वरन ईश्वरन यांनी त्याला प्रशिक्षण दिले. त्यांनीच २००८ मध्ये अभिमन्यू क्रिकेट अकादमी सुरू केली. वयाच्या १० व्या वर्षी, अभिमन्यू त्याच्या क्रिकेट कारकिर्दीसाठी कोलकात्याला गेला, तिथे त्याला प्रशिक्षक निर्मल सेनगुप्ता यांनी प्रशिक्षण दिले.

२०१७ मध्ये टी-२० मध्ये पदार्पण

अभिमन्यू इश्वरन याने ३१ जानेवारी २०१७ रोजी २०१६-१७ आंतरराज्य ट्वेंटी-२० स्पर्धेत बंगालकडून ट्वेंटी-२० मध्ये पदार्पण केले. ऑक्टोबर २०१८ मध्ये, त्याला २०१८-१९ देवधर ट्रॉफीसाठी इंडिया अ संघात स्थान देण्यात आले. तो २०१८-१९ रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून सहा सामन्यांमध्ये ८६१ धावा करून सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता.

इंडिया अ संघात मिळवले स्थान

ऑगस्ट २०१९ मध्ये, त्याला २०१९-२० दुलीप ट्रॉफीसाठी इंडिया रेडच्या संघात स्थान देण्यात आले. स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, त्याने इंडिया ग्रीनविरुद्ध १५३ धावा केल्या. ऑक्टोबर २०१९ मध्ये, त्याला २०१९-२० देवधर ट्रॉफीसाठी इंडिया अ संघात स्थान देण्यात आले.

टीम इंडियात पदार्पणाची यावेळी संधी

जानेवारी २०२१ मध्ये, इश्वरनची इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेसाठी भारताच्या कसोटी संघातील पाच स्टँडबाय खेळाडूंपैकी एक म्हणून त्याची निवड करण्यात आली. मे २०२१ मध्ये, २०१९-२० आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी आणि इंग्लंडविरुद्धच्या त्यांच्या अवे मालिकेसाठी भारताच्या कसोटी संघातील चार स्टँडबाय खेळाडूंपैकी एक म्हणून त्याची निवड करण्यात आली. इंग्लडमध्ये होत असलेल्या अँडरसन-तेंडूलकर ट्रॉफीमध्ये त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+