आता भारत आणि पाकिस्तानमध्ये रंगणार हायहोल्टेज क्रिकेट सामना, युवराज कर्णधार, तारीख वेळ जाणून घ्या
Wcl 2025 india vs pakistan : भारत आणि पाकिस्तान हे पारंपारिक शत्रू आहेच, मात्र क्रिकेटच्या मैदानातही हे शत्रुत्व अनेक वेळा वारंवार दिसून आलेलं आहे. जरी क्रिकेट हा खेळ सांघिक आणि दृढ संबंध निर्माण करणारा असला तरी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना म्हणजे हाय होल्टेज ड्रामाच म्हणावा लागेल. 26 एप्रिल रोजी भारतातील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखीनच बिघडलेले आहेत. दरम्यान बऱ्याच अंतरानंतर आता भारत आणि पाकिस्तान क्रिकेट सामना रंगणार आहे.

भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम राबवलं आणि पाकिस्तानमधील लपलेल्या अतिरेक्यांना शोधून त्यांना धडा शिकवला. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्ताननं भारतावर हल्ले सुरू केले, त्यामुळे भारताने पाकिस्तानच्या प्रमुख शहरांना लक्ष केलं. त्यानंतर युद्धविरामही झाला. या दरम्यान आयपीएल स्पर्धा ही थांबवण्यात आली होती. आता पाकिस्तानात होणाऱ्या आशिया कप स्पर्धेच्या संदर्भातही भारत खेळणार नाही हे स्पष्ट आहे. अशा पार्श्वभूमीवर भारताचे सामने दुबईत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, मात्र आशिया कप स्पर्धेला अजून बराच अवधी आहे. त्याआधीच भारत आणि पाकिस्तान समोरासमोर येणार आहे, भारत आणि पाकिस्तान डब्ल्यूसीएल अर्थात वर्ल्ड चॅम्पियनशिप लीजन्ट्ंस स्पर्धेत समोरा-समोर येणार आहेत.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना कुठे होणार?
वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लीजन्ट्स अर्थात डब्ल्यूसीएल 2025 चा एक मोठा मुकाबला भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. हा महासामना 20 जुलैला इंग्लंडच्या एजबेस्टन मैदानावर होणार आहे.
युवराज सिंहवर कर्णधारपदाची जबाबदारी
भारतातर्फे कर्णधार म्हणून भारतातर्फे कर्णधार म्हणून धुरंदर फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू युवराज सिंह तर पाकिस्तान कडून अनुभवी ऑल राऊंडर मोहम्मद हाफिज हा कर्णधार असणार आहे.
मागील स्पर्धेत भारत विजेता, पाकचा पराभव
बऱ्याच अंतरानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला नव्हता, दरम्यान मागील याच स्पर्धेत भारताने पाकिस्तानला हरवून ही स्पर्धा जिंकली होती. आता पाकिस्तान भारतासोबत मोठ्या त्वेषाने आणि जिंकण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे, मागच्या अंतिम सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानला चीत केलं होतं. पाकने दिलेलं 156 धावांचे आव्हान पाच गड्यांच्या मोबदल्यात भारतानं पूर्ण केलं होतं. रॉबिन उत्तप्पा आणि युसुफ पठाण यांनी जोरदार कामगिरी केली होती.
शिखर धवनही खेळणार
तसं पाहिलं तर पाकिस्तान न भारताला साखळी सामन्यामध्ये मोठ्या अंतराने हरवलं होतं इतिहासात दोन्ही संघ एकमेकांना आतापर्यंत कट्टर टक्कर देत आले आहेत डब्ल्यूसीएल स्पर्धेत यावेळी काही नवीन चेहरे सहभागी होणार आहेत त्यामध्ये भारतातर्फे शिखर धवन स्टुअर्ट बिन्नी आणि वरून उरण हे खेळाडू मैदानात दिसून येतील तर पाकिस्तान कडून शहीद अजमल सरफराज खान सोहेल खान हे खेळाडू संघात असतील.












Click it and Unblock the Notifications