U19 Women’s T20 Asia Cup : फिरकीपटूंनी गाजवले मैदान; भारतीय महिला संघाची फायनलमध्ये दणक्यात एंट्री
U19 Women's T20 Asia Cup : अंडर-19 महिला आशिया कपच्या अंतिम फेरीत भारताने दणक्यात प्रवेश केला. आज झालेल्या सामन्यात भारतीय महिला संघाने श्रीलंकेचा चार गडी राखून पराभव केला. आयुषी शुक्लाने 5 विकेट घेत श्रीलंका संघाची दाणादाण उडवली. श्रीलंकेचा संघ 98 धावांवर बाद गारद झाला. भारताने हे लक्ष्य 14.5 षटकांत पूर्ण केले. पाच विकेट घेतल्यामुळे आयुषी मॅन ऑफ द मॅच पुरस्काराची मानकरी ठरली. यामुळे अंतिम सामन्यात भारताची गाठ आता बांग्लादेशशी पडणार आहे.

भारताच्या फिरकीची कमाल
टीम इंडियाने टॉस जिंकत श्रीलंकेला बॅटिंगसाठी बोलावलं. भारतीय गोलंदाजांनी कर्णधार निकी प्रसाद हीचा निर्णय योग्य ठरवला. भारतीय गोलंदाजांसमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. कर्णधार मनुडी नानायकारा आणि सुमुदु निसांसलाने थोडा वेळ तग धरत श्रीलंकेची लाज राखली. मनुडी नानायकारा आणि सुमुदु निसांसला दोघींनी प्रत्येकी 33 आणि 21 धावा केल्या. भारतासाठी आयुषी शुक्ला हीने सर्वाधिक ५ विकेट्स मिळवल्या. पारुनिका सिसोदीया हीने दोघांना बाद केलं. तर शबनम शकील आणि द्रीथी केसरी या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.
India U19 Women register a 4-wicket win in their Super four clash against Sri Lanka U19 Women 👏👏
— BCCI Women (@BCCIWomen) December 20, 2024
Aayushi Shukla becomes the Player of the match for her match-winning four-wicket haul 🙌
Scorecard - https://t.co/ZQq5LIOiXk#TeamIndia | #ACCWomensU19AsiaCup | #ACC pic.twitter.com/6BQF71v26i
आयुषीच्या पाच विकेट
भारताची डावखुरी फिरकीपटू आयुषी शुक्लाने शानदार पाच विकेट घेत भारताला 19 वर्षांखालील महिला आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचवले. टीम इंडियाने श्रीलंकेवर शुक्रवारी ब्यूमास क्रिकेट ओव्हलवर चार गडी राखून विजय मिळवून दिला. बांगलादेशविरुद्ध भारताच्या मागील सुपर फोर विजयात तीन विकेट घेणाऱ्या आयुषीने 4-10 अशी आकडेवारी घेतली आणि श्रीलंकेला 20 षटकांत 98/9 पर्यंत रोखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सहकारी डावखुरी फिरकीपटू पारुनिका सिसोदियाने चांगली साथ दिली. तिनेही दोन बळी घेतले. शबनम शकील आणि धृती केसरी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
भारताचा सहज विजय
९९ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना भारतीय महिला संघाची सुरुवात खराब झाली. ईश्वरी अवसरे आणि सानिका चाळके यांना लवकर गमावूनही, जी त्रिशा आणि जी कमलिनी यांनी भारताला त्यांच्या 99 धावांचा पाठलाग करताना ट्रॅकवर टिकून राहत विजयाची खात्री दिली. 2023 महिला अंडर-19 T20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील त्रिशाने 24 चेंडूत 32 धावा केल्या आणि जी कमलिनीसोबत 63 धावांची भागीदारी केली.












Click it and Unblock the Notifications