T20 world cup 2024: पंतप्रधान मोदींना भेटणार विश्वविजेता संघ
Indian Cricket Team Meet PM Modi: भारतीय क्रिकेट संघाने T20 विश्वचषक जिंकल्याने संपूर्ण देश आनंदी आहे. 17 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर भारताने विश्वचषक जिंकला आहे. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून भारत दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड चॅम्पियन बनला.

अशा परिस्थितीत भारतीय संघाच्या विजयाने आनंदित झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्णधार रोहित शर्मा, वरिष्ठ फलंदाज विराट कोहली आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी फोनवर बोलून टी-20 विश्वचषक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, वेस्ट इंडिजहून परतल्यानंतर भारतीय संघ पंतप्रधान मोदींना भेटू शकतो.भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) वरिष्ठ अधिकारी या बैठकीची योजना आखतील, ज्यामध्ये सर्व खेळाडू उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
T20 विश्वचषक विजेता टीम इंडिया बार्बाडोसहून थेट दिल्लीत येणार आहे. वृत्तानुसार, मंगळवारी संध्याकाळपर्यंत भारतीय संघ मायदेशी परतणे शक्य आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघ दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे.
मात्र, झिम्बाब्वेविरुद्धच्या पाच टी-20 सामन्यांमुळे संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबे त्या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. यापूर्वी, इंस्टाग्रामवरील त्यांच्या अनेक पोस्टमध्ये, पीएम मोदींनी भारतीय संघाचे कौतुक केले आणि रोहित, विराट आणि मुख्य प्रशिक्षक द्रविडसाठी एक विशेष संदेश शेअर केला.
रोहितसाठी पंतप्रधान मोदींचा संदेश
रोहित शर्माच्या फोटोसोबत पंतप्रधानांनी लिहिले, "तुम्ही उत्कृष्टतेचे प्रतीक आहात. तुमची आक्रमक मानसिकता, फलंदाजी आणि कर्णधारपदामुळे भारतीय संघाला नवा आयाम मिळाला आहे. तुमची टी-20 कारकीर्द नेहमीच लक्षात राहील. तुमच्याशी बोलून आनंद झाला.
कोहलीसाठी पंतप्रधानांचा संदेश
विराट कोहलीसाठी पीएम मोदींनी लिहिले -"तुमच्याशी बोलून आनंद झाला. शेवटच्या डावातही तुम्ही भारतीय फलंदाजी चमकदारपणे हाताळली आहे. खेळाच्या सर्व प्रकारात तुम्ही चमकलात. टी-20 क्रिकेटमध्ये तुमची उणीव जाणवेल,पण आम्हाला विश्वास आहे की, तुम्ही नवीन पिढीतील खेळाडूंना प्रेरणा देत राहाल."
राहुल द्रविडसाठी पंतप्रधानांचा संदेश:
पंतप्रधान मोदींनी प्रशिक्षक द्रविडसाठी खास संदेश दिला आहे. "माजी भारतीय कर्णधाराला वर्ल्ड कप ट्रॉफीसह पाहून आनंद झाला. त्याचे अतूट समर्पण, धोरणात्मक अंतर्दृष्टी आणि योग्य प्रतिभेचे संगोपन केल्याने भारतीय संघाचा कायापालट झाला आहे. त्याच्या योगदानाबद्दल आणि पिढ्यांना प्रेरणा दिल्याबद्दल भारत त्याचा आभारी आहे. त्यांनी विश्वचषक ट्रॉफी उचल्याचं पाहून मला आनंद झाला आहे.












Click it and Unblock the Notifications