Suryakumar Yadav मोहसीन नक्वी वाद, ट्रॉफीबाबत सूर्याचे मोठे वक्तव्य! खरी ट्रॉफी कोणती थेट सांगितलं
Suryakumar yadav interview : भारताला AsiaCup2025 जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने दुबईत झालेल्या पत्रकार परिषदेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मोकळेपणाने भाष्य केले. आपली संपूर्ण मॅच फी दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना आणि भारतीय सशस्त्र दलांना दान करण्याच्या निर्णयापासून ते एसीसी अध्यक्षांकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नकार देण्यापर्यंत, त्याने प्रत्येक विषयावर आपले मत स्पष्टपणे मांडले.

१. मॅच फी दान करण्याच्या निर्णय, सूर्याचे मत
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांना आणि भारतीय सशस्त्र दलांना आपली संपूर्ण मॅच फी देण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, "जेव्हा मी पत्रकार परिषदेला जात होतो, तेव्हा मला वाटले की इतके भारतीय (प्रवासी) तिथे आहेत आणि आपण किमान काही मदत करू शकतो. जर प्रत्येकाने थोडे योगदान दिले, तर ते चांगले होईल. मी त्यावेळी (घोषणा करताना) माझे पूर्ण वाक्य पूर्ण करू शकलो नाही, कारण हे सशस्त्र दलांसाठी आणि पहलगामच्या पीडितांसाठी आहे. सर्व काही इतक्या वेगाने घडत होते की त्या गोंधळात मी जास्त काही बोलू शकलो नाही. पण मी जे काही करू शकतो, ते करेन." त्याने आपल्या कृतीतून देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकी दर्शवल्याचे स्पष्ट झाले.
२. ट्रॉफी स्वीकारण्यास नकार, वाद नाही तर मग काय?
भारताने एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्याकडून आशिया कप स्पर्धेची ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिल्याबद्दल कर्णधार सूर्यकुमार यादवने अत्यंत मार्मिक उत्तर दिले.तो म्हणाला, "मी याला वाद म्हणणार नाही. जर तुम्ही पाहिले असेल, तर लोकांनी ट्रॉफीचे फोटो इकडे तिकडे पोस्ट केले आहेत. पण खरा ट्रॉफी तेव्हाच मिळते, जेव्हा तुम्ही लोकांची, खेळाडूंची, तुम्ही कमावलेल्या विश्वासाची, सपोर्ट स्टाफची आणि त्यांनी दाखवलेल्या विश्वासाची, पडद्यामागे काम करणाऱ्या लोकांची मनं जिंकता, तीच खरा ट्रॉफी असते. खरा ट्रॉफी म्हणजे मैदानावरील इतक्या लोकांचे काम आणि प्रयत्न."
३. आशिया कप जिंकल्याबद्दल भावना काय होत्या?
आशिया कप जिंकल्याबद्दल संघाचा कर्णधार म्हणून आपल्या भावना व्यक्त करताना सूर्यकुमार यादव म्हणाला, "ही खूप चांगली भावना होती. जेव्हा तुम्ही अजिंक्य राहून (Unbeaten) स्पर्धा जिंकता, तेव्हा तुम्हाला खूप चांगले वाटते. संपूर्ण संघासाठी, संपूर्ण देशासाठी ही खूप चांगली भावना होती आणि ती खूप मजेदार होती. आम्ही काल रात्री एकत्र येऊन बसलो आणि आम्हाला खूप मजा आली..."












Click it and Unblock the Notifications