"मी सहज रडत नाही, पण त्या दिवशी मी खूप रडलो" श्रेयस अय्यरची काय आहे व्यथा, राग अन् निराशा? VIDEO पहा
Shreyas Iyer cried during the Champions Trophy 2025 : भारताचा धुरंधर फलंदाज आणि आयपीएलमध्ये पंजाब किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यर याने चॅम्पियन ट्राॅफीत भारतासाठी खूप चांगला खेळ केला. हा तसा खूप भावनिक आणि समंजस खेळाडू. आयपीएल स्पर्धेत तर तो सध्या फॉर्मात आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्जने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले. मात्र, राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
श्रेयसच पंजाब किंग्ज हा संघ आता चौथ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जशी भिडणार आहे. आयपीएलचा फिव्हर सुरु झाला नव्हता तेव्हाची एक धक्कादायक गोष्ट श्रेयस अय्यरने कबूल केली आहे आणि त्याविषयी स्पष्ट केले आहे की, चॅम्पियन ट्राॅफीसाठी दुबईत पहिल्या अभ्याससत्रादरम्यान त्याच्या डोळ्यात पाणी होते, अर्थात तो रडला होता.

श्रेयस अय्यरचा तो व्हिडिओ व्हायरल
श्रेयस अय्यरचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. श्रेयस अय्यरने एका मुलाखतीत अभिनेत्री साहिबा बालीसमोर आपली व्यथा मांडली. चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान मी शेवटचा रडलो होतो, असे अय्यरने सांगितले. श्रेयस अय्यर सांगतो की, "...ते पहिलेच सराव सत्र होते. मी खरं तर रडत होतो, स्वतःवर खूप रागावलो होतो. मलाही आश्चर्य वाटले की मी सहज रडत नाही, पण त्या दिवशी मी तुटलो होतो.
Sarpanch Saab's passion for the game... 🥹🤌🏻
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) April 7, 2025
Watch the full heartfelt conversation between Shreyas Iyer and Sahiba Bali on our YT channel and Punjab Kings App. 📹 pic.twitter.com/t1PBDtCY6M
फलंदाजी चांगली झाली नाही, अन् राग -राग
श्रेयस अय्यरला मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला की, तु शेवटचा कधी रडलास..त्यावर तो म्हणाला की चॅम्पियन ट्राॅफीदरम्यान मी रडलो होतो. सराव सत्रात मी फलंदाजी केली होती व ती चांगली झाली नाही. त्यावेळी मला स्वःतवरच खूप राग आला आणि मी रडू लागलो. तो म्हणाला की, मला अजून थोडे करावे लागेल, पण मला फलंदाजीची फारशी संधी मिळाली नाही. त्यामुळे मला खूप राग आला होता.
चॅम्पियन ट्राफीत श्रेयसच्या भारताकडून सर्वात जास्त धावा
श्रेयस अय्यर हे जरी बोलत असला तरीही त्याची चॅम्पियन ट्राॅफीतील कामगिरी चांगली होती. तो सर्वश्रेष्ठ फलंदाजापैकी एक होता. त्याने महत्वाच्या सामन्यात महत्वपूर्ण खेळी केली त्याने पाच सामन्यातील आपल्या खेळात 243 धावा केल्या होत्या. या स्पर्धेत तो भारताकडून सर्वात जास्त धावा करणारा फलंदाज होता.
श्रेयस अय्यरकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा
पीबीकेएस विरुद्ध सीएसके पंजाब चेन्नईचा सामना करेल, पंजाबला चेन्नईविरुद्ध कर्णधार श्रेयस अय्यरकडून मोठ्या धावसंख्येची अपेक्षा असेल. चेन्नई आणि पंजाब यांच्यात आतापर्यंत एकूण 30 सामने झाले आहेत. यापैकी चेन्नईने 16 सामने जिंकले असून पंजाबने 14 सामने जिंकले आहेत.












Click it and Unblock the Notifications