Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कसोटी संघातून रोहित शर्माचा पत्ता कट? BCCI ने निश्चित केला कसोटीचा नवा कर्णधार

सध्या पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या चॅम्पियन ट्राँफीचीच चर्चा सुरु आहे. येत्या १९ फेब्रुवारीपासून ही स्पर्धा सुरु होत आहे. मात्र भारतीय क्रिकेट रसिकांची धकधक वाढविणारी एक बातमी समोर येत आहे. ही बातमी रोहित शर्माची कसोटी कारकीर्द संकटात आल्याची आहे. एका बातमीनुसार बीसीसीआयने भारतीय कसोटी संघाचा नवा कर्णधार निश्चित केला आहे.

Rohit Sharma

आगामी कसोटीत नवा कर्णधार?

पीटीआयच्या एका वृत्तानुसार, आगामी जुन-जुलैमध्ये होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यांसाठी रोहित शर्माची निवड होण्याची शक्यता कमी आहे. कसोटी संघाचा उपकर्णधार जसप्रीत बुमराह इंग्लंड दौऱ्यापासून कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारेल, असे बोलले जात आहे. असे झाले तर, २०२४-२५ ला झालेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेतील कसोटी सामनाच रोहित शर्माचा शेवटचा कसोटी सामना असेल.

बुमराह नवा कर्णधार?

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी जसप्रीत बुमराहला भारतीय संघात संधी मिळाली नाही. त्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे, या वेगवान गोलंदाजाकडे भारताचा भावी कसोटी कर्णधार म्हणून पाहिले जात आहे. एनसीएने आपल्या अहवालात म्हटले आहे की, बुमराहच्या लेटेक्स स्कॅन अहवालात काहीही चुकीचे आढळले नाही. परंतु, अद्याप त्याने पूर्ण वेगाने गोलंदाजी सुरू केलेली नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीला जेमतेम एक आठवडा उरलेला असल्याने, संघ व्यवस्थापनाला त्याच्याबाबत कोणताही धोका पत्करला नाही.

बुमराहकडे संघाची कमान

या अहवालात म्हटले आहे की बीसीसीआयने बुमराहला भारताचा पुढचा कसोटी कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, "बुमराहने अद्याप पूर्णपणे गोलंदाजी सुरू केलेली नाही. इतक्या कमी वेळात सामन्यासाठी तंदुरुस्त होणे खूप कठीण आहे. त्याऐवजी, तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्समध्ये परतू शकतो आणि नंतर इंग्लंडमध्ये भारताचे नेतृत्व करू शकतो. कारण रोहित शर्माची पुन्हा कसोटी मालिकेसाठी निवड होण्याची शक्यता कमी आहे.

रोहितचा फार्म गायब

रोहित शर्माचे २०२४ हे कसोटी क्रिकेटमधील सर्वात वाईट वर्ष होते. या वर्षी त्याची सरासरी २५ पेक्षा कमी राहिली. या अनुभवी फलंदाजाने गेल्या आठ कसोटी सामन्यांमध्ये १०.९ च्या सरासरीने फक्त १६४ धावा केल्या. रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने सर्व सहा कसोटी गमावल्या. ज्यात न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर पहिलाच व्हाईटवॉश आणि ऑस्ट्रेलियातील तीन कसोटी पराभवांचा समावेश आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+