Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

"सोईनुसार देशभक्ती दाखवणे बंद करा" या पाकिस्तानच्या क्रिकेटपटूने भारतीय टीम आणि बीसीसीआयला फटकारलं

Pakistani cricketer Danish Kaneria criticizes Indian team BCCI : सिंदूर ऑपरेशन आणि त्यानंतरचा संघर्ष यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध चांगले दुरावले आहेत. भारतीय क्रिकेट टीमने डब्ल्यूसीएल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यास नकार दिल्यानंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला. त्यानंतर आता आशिया कप क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान सोबत न खेळण्याचे संभाव्य शक्यता पाहता पाकिस्तानच्या एका खेळाडूने भारताविरोधात थेट मत व्यक्त केले आहे.

आशिया कप स्पर्धेची घोषणा झाली असून त्यामध्ये भारताने पाकिस्तानचा सामना होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांची एकमेकांशी असलेली खुन्नस आणि टशन पाहायला मिळणार आहे. यादरम्यान या स्पर्धेत खेळण्यापासून भारत मागे हटू शकतो, अशी शक्यता वाटत असल्याने पाकिस्तानच्या एका निवृत्त क्रिकेटर आपले मत व्यक्त केले आणि स्पष्ट शब्दात त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Pakistani cricketer Danish Kaneria

तर दुसरीकडे क्रीडा रसिकांना भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय सीरीज गेल्या काही वर्षांपासून पाहायला मिळाली नाही, अशा स्थितीमध्ये आता मोठ्या इव्हेंटमध्ये तरी भारत- पाकिस्तान खेळतील का या संदर्भात प्रश्नचिन्ह आहे.

काय म्हणाला पाकिस्तानचा क्रिकेटर दानिश कानेरिया?

पाकिस्तानी पूर्व क्रिकेटर यांनी भारतीय टीमवर संताप व्यक्त केला आहे, सामान्यत: भारत आणि भारतीय संघाची संघाचे कौतूक करणारा खेळाडू यावेळी मात्र आपल्या तिखट भावना व्यक्त करताना दिसला. ट्विटरवर त्याने यासंदर्भात एक पोस्ट टाकली आहे. त्याने भारतीय खेळाडूंनी सोईनुसार वागणे बंद करायला हवे असे म्हटले आहे.

काय आहे दानिश कानेरीयाची पोस्ट?

दानिश कानेरियाने एक्सवर लिहिले आहे की, भारतीय खेळाडूंनी डब्ल्यूसीएल क्रिकेट स्पर्धेवर बहिष्कार घातला आणि त्यांनी राष्ट्रीय कर्तव्य निभवलं. मात्र डब्लुसीएल कप स्पर्धेत पाकिस्तान विरुद्ध न खेळून त्यांनी कर्तव्य निभावलं पण जर पाकिस्तान सोबत एशिया कपमध्ये क्रिकेट सामना खेळणे योग्य असेल तर डब्ल्यूसीएलमध्येही क्रिकेट सामना खेळणं योग्य असायला हवं होतं, सोयीनुसार भारतीय टीमने देशभक्ती दाखवणे बंद करायला हवं, खेळाला खेळासारखे राहू द्या त्याला प्रचार बनवू नका असे तो म्हणाला.

भारत आशिया कप क्रिकेट स्पर्धेचा यजमान

भारत आशिया कप क्रिकेट स्पर्धेचा यजमान असून ही स्पर्धा सप्टेंबर 2025 पासून सुरू होत आहे. पाकिस्तानी टीम खेळण्यासाठी भारतात येणार नाही, त्यामुळे ही स्पर्धा यूएईमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी होणार आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर आणि सिंदूर ऑपरेशननंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील राजकीय संबंध तसेच क्रीडा संबंधही बिघडलेले आहेत. इरफान पठाण युसुफ पठाण शिखर धवन आणि हरिभजन सिंग यांनी डब्ल्यूसीएलचा सामना खेळण्यास नकार दिला होता, त्यानंतर हा सामना रद्द झाला, त्या धर्तीवर दानिश कनेरियाची प्रतिक्रीया आली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+