IPL खेळलेल्या आणखी एका क्रिकेटपटूच्या जीवनात वादळ! पत्नीने दाखल केली हुंडा अन् कौटुंबिक छळाची केस
IPL cricketer Amit Mishra's wife Garima Tiwari files dowry domestic harassment case : मोहम्मद शमीनंतर आता IPL खेळलेला क्रिकेटर अमित मिश्रा याच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप त्याच्या पत्नीने केला आहे. त्यामुळे आता हा खेळाडू चांगलाच अडचणीत आला आहे.
कानपूरच्या मीरपूर येथील राहणारा अमित मिश्रा याच्यावर त्याची पत्नी गरिमा तिवारी हिने घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली. आता हे प्रकरण न्यायालयात पोहचले आहे. दरम्यान न्यायालयाकडून अमित मिश्रासह संबंधितांना नोटीस पाठवण्यात आली असून या प्रकरणात आता 26 मे रोजी सुनावणी होणार आहे.

काय आहे पत्नीचा आरोप
पत्नीने तक्रार दाखल करताना म्हटले की, कानपूरच्या किदवईनगर येथे लग्नानंतर अमित मिश्रासोबत पत्नी राहायला आली. यानंतर तिथे सासरच्या लोकांनी तिला हुंड्यासाठी त्रास दिला असे तिचे म्हणणे आहे. त्यानंतर अमितने तिला टिळकनगर येथे नेले तरीही त्रास सुरु होता. आपल्यासोबत मारहाण अमित करायचा तसेच मी कमवलेले पैसे हिसकावून घेत होता असा आरोप तिने केला आहे.
इतर मुलींशी सोशल मीडियावर अमित बोलत होता - पत्नीचा आरोप
पत्नी गरिमा हिने आरोप केला की, सोशल मीडियावर अमित मिश्रा इतर मुलींशी बोलत होता, याशिवाय तो तिला घटस्फोट देण्याची धमकी देत होता. मला मानसिक त्रास होत असल्याने मी तणावात होते आणि मी आत्महत्येचा प्रयत्न केला होता पण माझ्या आई -वडिलांनी मला वाचवले असे तिचे म्हणणे आहे.
माॅडेलिंग सोडावे लागले
कौटुंबिक प्रतारणा त्या त्रासातून मानसिक ताण-तणाव वाढला. मनस्थिती खराब असल्याकारणांमुळे तिला माॅडेलिंग सोडाव लागले असे तिच्या वकीलांनी स्पष्ट केल्याचे आजतकच्या वृत्तात म्हटले आहे.
कोण आहे गरिमा तिवारी?
गरिमा ही मॉडेल असून तिचा बिरहान रोड येथील रहिवासी आहे. 26 एप्रिल 2021 रोजी तिचे लग्न अमितशी झाले आहे. पतीविरुद्ध तक्रारीनंतर तिने न्यायालयाकडे मासिक भत्ता 50 हजार रुपये, दागिने परत करणे आणि पतीच्या घरात राहण्याचा हक्क मागितला आहे.
अमित मिश्राचे क्रिकेटमध्ये काय आहे योगदान?
- अमित मिश्राची क्रिकेटची सुरुवात रणजीतून झाली तो प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेला आहे.
- कानपूरमध्ये अमित मिश्राचा जन्म झाला आणि 2013-14 रणजी ट्रॉफी हंगामात त्याने पदार्पण केले होते. राजस्थानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात अमित मिश्राने 59 धावा केल्या.
- अमित मिश्राने त्याच्या पदार्पणाच्या हंगामात 19.77 च्या सरासरीने 27 बळी घेतले
- पुढील दोन हंगामात UP संघाचा गोलंदाज सदस्य म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली.
- 2014 मध्ये राजस्थान राॅय़ल्सकडून आयपीएलमध्ये तो दहा लाख रुपये बेस प्राईजमध्ये त्याला विकत घेण्यात आले होते.पण त्याला कोणताही मॅच खेळण्याची संधी मिळाली नव्हती.
- त्यानंतर गुजरातने 2016 मध्ये दहा लाख रुपयांत या खेळाडूला खरेदी केले होते.












Click it and Unblock the Notifications