Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Avesh khan : SRHसाठी कर्दनकाळ ठरेल आवेश खान; वाचा त्याची IPL कारकिर्द, LSGने काय घेतला निर्णय?

Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants : हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली. नाणेफेक जिंकल्यानंतर कर्णधार ऋषभ पंतने एका खेळाडूला संघातून वगळल्याबद्दल सांगितले.

शाहबाज अहमदला त्याच्या प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे आणि त्याच्या जागी आवेश खानला संधी देण्यात आली आहे. दुखापतीमुळे आवेश खान पहिला सामना खेळला नाही पण तो तंदुरुस्त होताच दुसऱ्या सामन्यात त्याला संधी देण्यात आली. त्यामुळे आवेश खान हा हैदराबाद संघासाठी कर्दनकाळ ठरणार आहे.

avesh khan

आवेश खानची आयपीएल कारकीर्द

  • 2017 च्या आयपीएल लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आवेश खानला पहिल्यांदा 10 लाख रुपयांना खरेदी केले होते.
  • पुढच्या वर्षी, दिल्ली कॅपिटल्सने त्याला 70 लाख रुपये देऊन त्यांच्या संघात सामील केले. दिल्ली कॅपिटल्सकडून चार वर्षे खेळल्यानंतर, आवेश खानला 2022 च्या आयपीएल मेगा लिलावात लखनौ सुपर जायंट्सने 10 कोटी रुपयांना खरेदी केले, तर त्याची मूळ किंमत 50 लाख रुपये होती.
  • फ्रँचायझीने त्याला 2023 च्या हंगामासाठी 10 कोटी रुपयांच्या किमतीत कायम ठेवले.
  • 2024 च्या आयपीएल लिलावापूर्वी, आवेश खानला 10 कोटी रुपयांच्या व्यवहारातून राजस्थान रॉयल्स संघात सामील करण्यात आले.
  • तर यंदाच्या आयपीएलमध्ये आवेश खान पुन्हा लखनऊ सुपर जायंट्सोबत जॉईन झाला आहे.

लखनौ सुपरजायंट्स प्लेइंग इलेव्हन

एडेन मार्करम, निकोलस पूरन, ऋषभ पंत, अब्दुल समद, डेव्हिड मिलर, आयुष बदोनी, डेव्हिड मिलर, आयुष बदोनी, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, आवेश खान, दिग्वेश राठी आणि प्रिन्स यादव.

सनरायझर्स हैदराबादचा प्लेइंग इलेव्हन

अभिषेक शर्मा, ट्रॅव्हिस हेड, इशान किशन, नितीश रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स, सिमरजीत सिंग, हर्षल पटेल आणि मोहम्मद शमी.

आवेश खान हैदराबादसाठी धोका

आवेशचा लखनौ संघात प्रवेश ही हैदराबादच्या सलामीवीरांसाठी चांगली बातमी नाही. कारण आवेश खानने ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा दोघांनाही प्रत्येकी 2 वेळा बाद केले आहे. अभिषेक शर्माची अवेशविरुद्ध सरासरी फक्त 5.5 आहे आणि हेडची सरासरी फक्त 18.5 आहे.

टॉसनंतर ऋषभ पंत काय म्हणाला?

नाणेफेक जिंकल्यानंतर ऋषभ पंत म्हणाला की, सनरायझर्स हैदराबादने कितीही धावा केल्या तरी त्याला काही फरक पडणार नाही कारण त्याचा संघ लक्ष्य गाठेल. पंत म्हणाला की खेळपट्टी चांगली आहे आणि त्याची फलंदाजी चांगली आहे आणि तो कोणतेही लक्ष्य साध्य करू शकतो.

पॅट कमिन्स काय म्हणाला?

पॅट कमिन्स म्हणाले की, नाणेफेकीचा निकाल काय लागला याने काही फरक पडत नाही, त्यांचा संघ नेहमीच सकारात्मक क्रिकेट खेळू इच्छितो. पॅट कमिन्स म्हणाला की मजा मोकळेपणाने खेळण्यात आहे. कमिन्स म्हणाले की, गोलंदाजीत तुम्ही प्रति षटक 10 किंवा 11 धावा दिल्या तरीही ते सामना जिंकणारे आहे. कमिन्स म्हणाले की, फलंदाज पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारतील अशी आशा आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+