Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

धोनीचा राग, स्पॉट फिक्सिंग प्रकरण ते किंग खानला वानखेडेवर बंदी, आयपीएलच्या इतिहासातील 5 मोठे वाद

IPL biggest controversies: आयपीएलची सुरुवात 2008 मध्ये मोठ्या थाटात मोठ्यात सुरुवात झाली. आता या स्पर्धेने जगातील सर्वात मोठी टी-20 लीग म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड व्यतिरिक्त न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेसह इतर क्रिकेट संघातील खेळाडूंनी आतापर्यंत या लीगद्वारे स्वतःचे नाव कमावण्यात यश मिळवले आहे.

आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या वादांवर एक नजर

आयपीएलने आपल्या 17 वर्षांच्या इतिहासात वर्षानुवर्षे अनेक वाद पाहिले आहेत. तीन दिवसांनंतर आयपीएल 2025 ला सुरुवात ईडन गार्डन्समध्ये गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या संघाने होईल. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला या लेखाद्वारे आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या काही वादांबद्दल सांगणार आहोत.

IPL Controversies

शाहरुख खानला वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश करण्यास बंदी

2012 मध्ये आयपीएलच्या पाचव्या हंगामात गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील कोलकाता नाईट रायडर्सने पाच प्रयत्नांमध्ये त्यांचे पहिले आयपीएल विजेतेपद जिंकले होते. चेपॉक येथे झालेल्या अंतिम सामन्यात त्यांनी चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला. अशाप्रकारे कर्णधार एमएस धोनी विजेतेपदांची हॅटट्रिक पूर्ण करण्यापासून वंचित राहिला.

दरम्यान त्या हंगामात केकेआरचा सह-मालक शाहरुख खानने 16 मे रोजी मुंबई इंडियन्स विरुद्धच्या त्याच्या संघाच्या सामन्यादरम्यान वानखेडे स्टेडियमवर सुरक्षा कर्मचाऱ्यांशी जोरदार वाद झाला होता. गंभीरच्या नेतृत्वाखालील संघाने तो सामना 32 धावांनी जिंकला. स्टेडियमच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी झालेल्या झटपट झाल्यामुळे बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानला या वानखेडे स्टेडियमवर पाच वर्षांच्या बंदीला सामोरे जावे लागले होते.

कोहली आणि गंभीरमध्ये जोरदार वाद

विराट कोहली आणि गौतम गंभीर दोघेही आक्रमक वृत्तीचे खेळाडू आहेत. त्यांच्या शानदार कारकिर्दीत दोघांचेही अनेक वेळा एकमेकांशी भांडण झाले आहे. पहिली घटना 2013 मध्ये चिन्नास्वामी येथे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या तत्कालीन गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या घरच्या सामन्यादरम्यान घडली.

आरसीबीच्या 155 धावांच्या पाठलागात 27 चेंडूत 35 धावा करून कोहली बाद झाल्यानंतर लगेचच त्याने केकेआरचा कर्णधार गंभीरशी शाब्दिक युद्ध सुरू केले आणि नंतर डगआउटमध्ये परतला. एका दशकानंतर कोहली पुन्हा एकदा गंभीरला लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या आरसीबीच्या सामन्यात भेटला. त्यावेळी गौतम गंभीर हा तो एलएसजीचा कोच होता. त्यादरम्यान अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हकमुळे गंभीर पुन्हा एकदा कोहली यांच्यात वाद झाला होता.

2013 चा स्पॉट फिक्सिंग घोटाळा

सहाव्या हंगामात राजस्थान रॉयल्सच्या तीन क्रिकेटपटूंचा समावेश असलेला कुप्रसिद्ध स्पॉट-फिक्सिंग घोटाळा घडला. आयपीएलच्या इतिहासातील हा सर्वात मोठा घोटाळा आहे. 15 मे रोजी वानखेडे स्टेडियम येथे मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यानंतर स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली श्रीशांतला दिल्ली पोलिसांनी आरआर संघातील सहकारी अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्यासह अटक केली होती.

जेव्हा धोनी पंचांच्या निर्णयावर संतापला आणि मैदानात उतरला

दिग्गज कर्णधार आणि यष्टिरक्षक-फलंदाज धोनी हा अत्यंत दबावाच्या परिस्थितीतही त्याच्या शांत वर्तनासाठी ओळखला जातो. आयपीएल दरम्यान काही वेळा धोनीने मैदानावर आपला संताप व्यक्त केला आहे. त्यापैकी एक प्रसंग जयपूरमध्ये आरआर विरुद्ध सीएसकेच्या सामन्यादरम्यान एम एस धोनी डगआउटमधून मैदानावर आला होता.

राजस्थानने दिलेल्या 152 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईच्या शेवटच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर धोनी बाद झाला पण बेन स्टोक्सने टाकलेल्या फुल टॉसला सुरुवातीला पंचांनी कंबर पेक्षा उंचावलेला नो-बॉल दिल्याने तो धोनी संतापाने मैदानात परतला, परंतु स्क्वेअर-लेग पंचांनी तो रद्द केला. दरम्यान 'कॅप्टन कूल' ला त्याच्या आक्रमक वृत्तीबद्दल त्याच्या सामना फिसच्या 50 टक्के दंड भरावा लागला होता.

हरभजन सिंगने श्रीशांतला थप्पड लगावली

आयपीएलमधील पहिला मोठा वाद 2008 च्या पहिल्या हंगामात घडला होता. 25 एप्रिल रोजी मोहालीमध्ये जेव्हा पंजाब किंग्जने (तेव्हाचे किंग्ज इलेव्हन पंजाब) मुंबई इंडियन्सचा 66 धावांनी पराभव केला त्यावेळी पीबीकेएसचा वेगवान गोलंदाज एस श्रीशांतला एमआय कर्णधार हरभजन सिंगने थप्पड मारल्यानंतर रडताना दिसला. वेगवान गोलंदाज श्रीशांतला त्याच्या प्रतिस्पर्ध्यांना त्रास देण्याची सवय होती आणि हरभजन त्याच्या या कृत्याने चिडला आणि त्याने त्याला थप्पड मारली. नंतर हरभजनने या घटनेबद्दल माफी मागितली
होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+