रोहित शर्माने त्याला मिठी मारली, कानांत काहीतरी सांगितले अन् पठ्ठ्या मैदानात उतरला; कोण आहे राजू?
आयपीएलच्या आजच्या सामन्यांत मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना सुरु आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. आजच्या मुंबईच्या संघात एक बदल करण्यात आला. चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध प्रदार्पणातच तीन बळी घेणाऱ्या विघ्नेश पथूरला आज वगळण्यात आले. त्याच्याऐवजी सत्यनारायण राजूला संधी देण्यात आली. मात्र सामना सुरु होण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने सत्यनारायण राजूला मिठी मारुन त्याच्या कानात काहीतरी सांगितले. त्यानंतर राजू खेळण्यासाठी थेट मैदानात उतरला. रोहितने राजूला मिठी का मारली? रोहितने राजूला नेमके काय सांगितले? हे प्रश्न चाहत्यांकडून विचारले जाऊ लागले आहेत.

सामन्यापूर्वी काय झाले?
रोहित शर्माला इंडियन प्रीमियर लीगमधील दिग्गज कर्णधारांपैकी एक मानले जाते. त्याने मुंबई संघाला स्वतःच्या नेतृत्त्वाखाली आत्तापर्यंत पाच आयपीएल ट्रॉफी जिंकून दिल्या आहेत. रोहितने हा एक माईलस्टोन तयार केला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या अनेक खेळाडूंनी तो एक उत्तम नेता असल्याचे जाहीर कबूल केले आहे. आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्यातला बेस्ट परफाॅर्मंस बाहेर काढणे, रोहितला चांगले जमते. आपल्यातल्या खिलाडुवृत्तीचा व सर्वांना समान वागविण्याचा तो अनेकदा प्रयत्न करत असतो. आज सामन्यापूर्वी रोहितने सत्यनारायण राजूला मिठी मारली.
रोहितने का मारली मिठी?
गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सध्या सुरू असलेल्या आयपीएल २०२५ च्या सामन्यापूर्वी रोहित शर्मा सत्यनारायण राजूला मिठी मारताना दिसला . विशेष म्हणजे आजच्या सामन्यांत मुंबईने स्टार फिरकी गोलंदाज विघ्नेश पुथूरला वगळून राजूला संधी दिली. राजूने आयपीएलमध्ये यापूर्वी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पहिला सामना खेळला होता. त्या सामन्यांत त्याला फक्त एकच षटक देण्यात आले. त्या षटकात राजूने १३ धावा दिल्या होत्या. कदाचित आजच्या सामन्यांत राजूचा आत्मविश्वास वाढावा, यासाठी रोहितने त्याची गळाभेट घेतली असे सांगितले जात आहे.
कोण आहे सत्यनारायण राजू?
आंध्र प्रदेशातील २५ वर्षीय वेगवान गोलंदाज सत्यनारायण राजूला आयपीएल २०२५ च्या मेगा-लिलावात मुंबई इंडियन्सने ३० लाख रुपयांना निवडले. स्थानिक हंगामात खेळताना राजूने दबावाखाली चांगली कामगिरी केल्याने मुंबई इंडियन्सने त्याला घेतले. २०२४ च्या आंध्र प्रीमियर लीगमध्ये राजूने पहिल्यांदा लक्ष वेधले. जिथे त्याने सात सामन्यांमध्ये आठ विकेट्स घेतल्या आणि त्याचा इकॉनॉमी रेट ६.१५ इतका होता. याव्यतिरिक्त सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (SMAT) आणि रणजी ट्रॉफीमधील त्याच्या कामगिरीमुळे एक विश्वासार्ह गोलंदाज म्हणून त्याची प्रतिष्ठा आणखी मजबूत केली होती.












Click it and Unblock the Notifications