धक्कादायक! IPL सुरू होण्यापूर्वीच बुमराहची क्रिकेट कारकिर्द संपणार!, नेमकं काय घडलंय, वाचा सविस्तर
IPL 2025, Jasprit Bumrah : आयपीएल-2025 ला सुरुवात होण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. अशातच, जसप्रीत बुमराह आयपीएलमध्ये खेळणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. तो एका मोठ्या संकटाला सामोरे जात आहे. अशातच त्याबाबत मुंबई इंडियन्सचे माजी गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉंड यांनी मोठा दावा केला. तसेच बुमराहबाबत चिंता देखील व्यक्त केली आहे.
न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज आणि मुंबई इंडियन्सचा माजी गोलंदाजी प्रशिक्षक शेन बाँड यांनी जसप्रीत बुमराहच्या वारंवार होणाऱ्या पाठीच्या दुखापतींबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्याने असे सुचवले की या ठिकाणी आणखी एक धक्का बसल्यास त्याची क्रिकेट कारकिर्दच संपुष्टात येऊ शकते.
बाँडने बुमराहच्या कामाचा ताण व्यवस्थापित करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. विशेषतः, त्याने सलग दोनपेक्षा जास्त कसोटी सामने खेळणे टाळावे. पाठीच्या दुखापतीमुळे खेळाबाहेर असलेला बुमराह भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयाला मुकला. भारताच्या क्रिकेट यशात त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल विराट कोहलीने त्याला 'राष्ट्रीय संपत्ती' असे संबोधलेले आहे.

IPLमध्ये बुमराह खेळणार की नाही?
बुमराहची तपासणी बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे सुरू आहे. 22 मार्चपासून सुरू होणाऱ्या आगामी इंडियन प्रीमियर लीग (IPL-2025) साठी त्याची उपलब्धता अनिश्चित मानली जात आहे. पाठीच्या दुखापतींमुळे बॉन्ड्सच्या कारकिर्दीवरही परिणाम झाला. 2001 ते 2010 दरम्यान तो न्यूझीलंडसाठी फक्त 120 सामने खेळला. वयाच्या 29 व्या वर्षी त्याच्या पाठीवर पहिली शस्त्रक्रिया झाली, परंतु तो 34 वर्षांचा होईपर्यंत खेळू शकला. सततच्या दुखापतीमुळे बाँडला सहा महिन्यांत प्रथम कसोटी आणि नंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी लागली.
हा अनुभव धरुनच बॉंड यानी सांगितले की, टी-20 क्रिकेटपासून कसोटी सामन्यांकडे होणारे संक्रमण बुमराहसारख्या गोलंदाजांसाठी मोठे आव्हान उभे करते. 25 मे रोजी आयपीएल संपल्यानंतर लवकरच भारत इंग्लंडमध्ये 5 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे, यावर बाँडने भर दिला. फॉरमॅटमध्ये झपाट्याने बदल करणे धोकादायक असू शकते, विशेषतः जेव्हा लहान टी-20 फॉरमॅटमधून आव्हानात्मक कसोटी सामन्यांकडे वळायचे असेल, तेव्हा मोठ्या आव्हानांना सामोरे जावे लागते.
भारताचा इंग्लंड दौरा खूप रोमांचक असेल, ज्यामध्ये 28 जून ते 3 ऑगस्ट दरम्यान पाच कसोटी सामने खेळले जातील. भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याप्रमाणे बुमराहवर जास्त कामाचा ताण देऊ नका असा सल्ला देखील बॉंड यांनी दिलाय. जिथे त्याने चार कसोटी सामन्यांमध्ये 151 पेक्षा जास्त षटके टाकली. विश्वचषकासारख्या भविष्यातील स्पर्धांमध्ये बुमराहच्या सहभागासाठी त्याच्या कामाचा ताण व्यवस्थापित करणे महत्त्वाचे आहे यावर त्यांनी भर दिलाा गेला पाहिजे, असेही बॉंड याने स्पष्ट केले.
"विश्वचषक व इतर सामन्यांसाठी तो खूप मौल्यवान"
बाँड म्हणाले की, तुम्ही इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामने खेळाल; मला त्याला सलग दोनपेक्षा जास्त कसोटी सामने खेळवायला आवडणार नाही. देशांतर्गत क्रिकेट संपल्यानंतर, इंग्लंड दौऱ्यापूर्वी बुमराहसाठी आयपीएल हा एकमेव स्पर्धात्मक प्लॅटफॉर्म आहे. तथापि, बुमराह परतल्यानंतर किती तीव्रतेने गोलंदाजी करतो यावर अवलंबून, आयपीएलमध्ये सहभागी होणे धोकादायक असू शकते असे बाँडचे मत आहे. भारतीय क्रिकेटमधील निर्णय घेणाऱ्यांनी सुरक्षित मार्ग शोधण्यासाठी बुमराहसोबत काम केले पाहिजे.












Click it and Unblock the Notifications