IPL 2025 : मुंबई इंडियन्स कि दिल्ली कॅपिटल्स? प्लेऑफसाठी दोघेही कसे पात्र ठरू शकतात? समजून घ्या गणित
IPL 2025 : आयपीएल स्पर्धांचा थरार आता प्लेऑफ लढतीकडे पोहचत आहे. गेल्या काही दिवसांत स्थगित करण्यात आलेली ही स्पर्धा आता पुन्हा रंगात येत आहे. काल 19 मे रोजी झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून लखनऊचा 6 गडी राखून पराभव झाला. त्यामुळे हा संघ आता घरी गेला आहे. हैदराबाद संघ डुबला आणि लखनऊ संघाला घेऊन डुबला असेच म्हणावे लागेल तर दुसरीकडे मुंबई आणि दिल्लीला प्लेऑफच्या आशा लागल्या आहेत.
दिल्ली आणि मुंबई संघात आता प्लेऑफमध्ये जाण्यासाठी चांगलीच चुरस आहे पण या दोघांपैकी कोणता संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आणि दोन्ही संघांना कशी चांगली संधी आहे हे गणित समजून घेऊया.

प्लेऑफसाठी आजपर्यंत कोणते संघ ठरले पात्र
पराभवानंतर पाईंट टेबलध्ये मागे पडलेले संघ एकामागून एक घरी गेले. यामध्ये राजस्थान, हैदराबाद, लखनऊ, कोलकाता नाईट रायडर, चेन्नई सुपरकिंगज यांचा समावेश आहे. दरम्यान, प्ले ऑफसाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज पात्र ठरले आहेत. आता चौथ्या आणि शेवटच्या स्थानासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये स्पर्धा आहे.
दिल्ली कॅपिटल्स प्लेऑफसाठी कशी पात्र ठरू शकते?
- आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीत दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे फक्त दोन संघ शिल्लक आहेत. आता सर्वांच्या नजरा दिल्ली आणि मुंबई संघाच्या कामगिरीवर लागल्या आहेत. तर आपण पाहुया कि दिल्ली कॅपीटलला प्लेऑफमध्ये जाण्याचे कसे चान्सेस आहे ते..
- दिल्ली कॅपिटल्सचे सध्या 12 सामन्यांत 13 गुण आहेत, त्यात 6 विजय आणि +0.260 चा नेट रन रेट आहे. त्यांचा पुढचा सामना 21 मे रोजी मुंबई इंडियन्स आणि 24 मे रोजी पंजाब किंग्जशी होईल.
- डीसीसाठी प्लेऑफचा मार्ग मोकळा आहे, पण त्यांना दोन्ही सामने जिंकून 17 गुण मिळवायचे आहेत आणि नेट रन रेटची चिंता न करता त्यांना प्लेऑफमध्ये स्थान मिळू शकते.
दिल्ली संघाचे तिकीट मुंबई इंडियन्सच्या हातात!
दिल्लीचा मुंबईविरुद्धचा सामना अत्यंत महत्त्वाचा असेल, जर त्यांनी ती स्पर्धा गमावली तर त्यांच्यासाठी सर्व रस्ते संपतील कारण एमआयला 16 गुण मिळतील आणि ते प्लेऑफसाठी पात्र ठरतील.
जर त्यांनी मुंबई विरुद्ध विजय मिळवला आणि पीबीकेएस विरुद्ध पराभव पत्करला तर डीसीचे 15 गुण होतील आणि दिल्ली संघाचे भवितव्य 26 मे रोजी मुंबई विरुद्ध पंजाब किंग्ज या सामन्यावर राहील. या सामन्यात मुंबई हरली तरच दिल्ली प्ले ऑफमध्ये जाईल. एका अर्थाने दिल्ली संघाचे तिकीट मुंबई इंडियन्सच्या हातात आहे असेच म्हणावे लागेल.
मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये कशी पोहचू शकते?
- जर प्लेऑफचे तिकीट मिळवायचे असेल तर मुंबईसाठी त्यांचे बाकीचे सामने महत्वाचे आहेत. दिल्ली कॅपीटल्सप्रमाणेच, मुंबई इंडियन्सचे भवितव्यही दिल्ली संघाच्या हातात आहे.
- जर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील एमआयने त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे 18 गुण होतील आणि प्लेऑफसाठी पात्र होण्यासाठी त्यांना नेट रन रेटवर अवलंबून राहावे लागणार नाही.
- जर ते दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पराभूत झाले तर त्यांच्यासाठी परिस्थिती अधिक अवघड होईल. कारण 26 मे रोजी पीबीकेएस विरुद्धचा सामना जिंकणे आवश्यक असेल.
- 24 मे रोजी पीबीकेएस विरुद्धचा सामना दिल्लीने गमावला तर त्यांचा अधिक फायदा होऊ शकेल पण त्यांना दिल्ली कॅपीटल्सचा पराभव व्हावा प्रार्थना करावी लागेल.












Click it and Unblock the Notifications