Ind Vs NZ : टीम इंडियाने जिंकली चॅम्पियन ट्राँफी; कसा रंगला रोमांच? वाचा संपूर्ण मॅचचे हायलाईट्स
दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळण्यात आलेली चॅम्पियन ट्राँफीची फायनल भारताने जिंकली. भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. तीन वेळा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा भारत पहिला संघ बनला आहे. भारताने यापूर्वी २००२ मध्ये विजेतेपद सामायिक केले होते. २०१३ मध्ये इंग्लंडला हरवून भारताने दुसऱ्यांदा विजेतेपद जिंकले होते. आज भारताने हा विक्रम तिसऱ्यांदा केला.

भारताच्या डावाचे हायलाईट्स
- रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी भारताकडून डावाची सुरुवात केली आहे.
- रोहित शर्माने फक्त ४१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.
- भारताने १० षटकांत एकही विकेट न गमावता ६४ धावा केल्या आहेत.
- भारतीय संघाने १७ षटकांत १०० धावा पूर्ण केल्या आहेत.
- रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनीही शतकी भागीदारी केली आहे.
- शुभमन गिल ३१ धावा करून बाद झाला. त्याला सँटनरने बळी ठरवले आहे.
- विराट कोहली फक्त एक धाव काढल्यानंतर बाद झाला. मायकेल ब्रेसवेलने त्याची शिकार केली आहे.
- २५ षटकांनंतर, भारतीय क्रिकेट संघाने २ षटकांत १२२ धावा केल्या आहेत.
- रोहित शर्मा ७६ धावांची खेळी खेळून बाद झाला. रचिन रवींद्रने त्याला आपला बळी बनवले आहे.
- श्रेयस अय्यरला काइल जेमीसनने ४४ धावांवर जीवदान दिले.
- श्रेयस अय्यर ४८ धावा करून बाद झाला. त्याला रचिन रवींद्रने बाद केले आहे.
- अक्षर पटेलला मायकेल ब्रेसवेलने पायचीत केले.
- केएल राहुल व रवींद्र जडेजा जोडीने भारताला विजय मिळवून दिला.
न्यूझीलंडच्या डावाचे हायलाईट्स
- रचिन रवींद्र आणि विल यंग यांनी न्यूझीलंडकडून डावाची सुरुवात केली.
- भारताकडून मोहम्मद शमीने गोलंदाजी सुरू केली आहे.
- न्यूझीलंड क्रिकेट संघाने पाच षटकांनंतर ४५ धावा केल्या आहेत.
- २९ धावांवर रचिन रवींद्रचा कॅच श्रेयस अय्यरने सोडला.
- वरुण चक्रवर्तीने भारताला पहिले यश मिळवून दिले. विल यंग १५ धावा करून बाद झाला.
- कुलदीप यादवने ११ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर रचिन रवींद्रला बाद केले. त्याला फक्त ३७ धावा करता आल्या आहेत.
- कुलदीप यादवने केन विल्यमसनला फक्त ११ धावांवर बाद केले.
- न्यूझीलंड क्रिकेट संघाने २० षटकांनंतर १०० धावांचा टप्पा पूर्ण केला आहे.
- टॉम लॅथमला रवींद्र जडेजाने बाद केले. तो फक्त १४ धावा करून बाद झाला.
- डॅरिल मिशेल आणि रचिन रवींद्र यांनी डावाची धुरा सांभाळली आहे. संघाचा स्कोअर १५० च्या पुढे गेला आहे.
- वरुण चक्रवर्तीने ग्लेन फिलिप्सला बाद केले आहे.
- मोहम्मद शमीने जलदगती गोलंदाज डॅरिल मिशेलला ६३ धावांवर बाद केले.
- ब्रेसवेल आणि मिशेल यांच्या अर्धशतकांमुळे न्यूझीलंड क्रिकेट संघाने २५१ धावा केल्या आहेत.
कशी होती टीम इंडियाची कामगिरी
- भारताने त्यांच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशचा ६ गडी राखून पराभव केला.
- भारताने दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा ६ विकेट्सने पराभव केला.
- लीगमधील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४४ धावांनी पराभव केला.
- उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ४ विकेट्सने पराभव केला.
टीम इंडियाचा चॅम्पियन्स ट्रॉफीचा इतिहास
- भारतीय संघ २००० मध्ये पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र, या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.
- २००२ मध्ये भारतीय संघ दुसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला. पावसामुळे सामना खेळवता आला नाही. ते यजमान श्रीलंकेसह संयुक्त विजेते बनले.
- २०१३ मध्ये भारतीय संघ तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला. या सामन्यात भारताने यजमान इंग्लंडला हरवून दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
- २०१७ मध्ये भारतीय संघ चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचला. मात्र, या सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला.
- भारतीय संघ २०२५ मध्ये पाचव्यांदा अंतिम फेरीत पोहोचला आहे. या रोमांचक सामन्यात त्यांचा सामना न्यूझीलंडशी होत आहे.
भारताचा सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
- विराट कोहली - २१७ धावा
- श्रेयस अय्यर - १९५ धावा
भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज
- मोहम्मद शमी - ८ बळी
- वरुण चक्रवर्ती - ७ बळी












Click it and Unblock the Notifications