Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

India Vs England 2nd test : शतक ठोकून शुभमन गिलचे जोरदार प्रत्युत्तर, इंग्लडविरुद्ध भारत आघाडी घेणार

India Vs England 2nd test shubman gills century : पहिल्या कसोटीत पराभव स्वीकाराव्या लागलेल्या भारतीय संघाची एजबॅस्टन येथे कालपासून सुरु झालेल्या दुसऱ्या कसोटीत हाराकिरी होता होता थांबली. कारण होते शुभमन गिल, त्याने भारताचा डाव सावरला आणि कर्णधाराला साजेशी खेळी करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. भारताच्या पहिल्या डावात सध्या ५ गडी बाद ३१० धावा झाल्या असून आज कसोटीच्या दुसऱ्या दिवशी या धावसंख्येवरुन पुढे खेळायला सुरुवात करेल.

India Vs England 2nd test

पहिल्या दिवशी गिलच्या जबरदस्त शतकामुळे इंग्लंडची पिछेहाट झाली असेच म्हणावे लागेल. कारण पहिल्याच दिवशी इंग्लडने भारतावर चांगलीच पकड मिळवली होती. पहिल्या शंभर धावांत भारताचे दोन मोहरे इंग्लडच्या गोलंदाजांनी बाद केले. त्यानंतर टीम इंग्लडचा खेळ प्रगतीपथावरच होता. त्यावर मात दिली ती, शुभमन गिलने...

Take a Poll

शुभमन गिलचे तडाखेबंद शतक

नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडच्या बेन स्टोक्सने सलग दुसऱ्या कसोटीसाठी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान संघाच्या गोलंदाजीचा सामना करत यशस्वी जैस्वालने ८७ धावा केल्या तर केएल राहुल संघाच्या केवळ १५ धावा असतानाच स्वस्तात बाद झाला. त्यानंर ९५ धावांव करुन नायर बाद झाला, त्याने संघासाठी ३१ धावांचे योगदान दिले. त्यानंतर आलेल्या शुभमन गिलने पहिला दिवस गावला आणि २१६ चेंडूत ११४ धावा करुन तो नाबाद राहीला.

यादरम्यान ऋषभ पंतने २५ धावाचे योगदान देत तो तंबूत परतला. त्यानंतर नितीश रेड्डीही फारशी चमक दाखवू शकला नाही. तो अवघी १ धाव काढून बाद झाला. त्यानंतर रविंद्र जडेजा फलंदाजीस उतरला आणि तो दिवसाअखेर शुभमन गिलसोबत खेळताना ४१ धावांवर नाबाद आहे. दिवसाअखेर भारताच्या ५ बाद ३१० धावा झाल्या होत्या.

इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजाने नवव्या षटकात केएल राहुलला क्रिस वोक्सने बाद केले तेव्हा भारताची सुरुवातच खराब झाली. त्यानंतर ब्राइडन कार्स (१-२९) ने लंचच्या अगदी आधी करुण नायर (३१) ला बाद केले. दुसऱ्या सत्रात भारताची धावसंख्या ९८-२ झाली.

गिलने अझहरोद्दीनची केली बरोबरी

कर्णधार गिलने भारताचे कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. हे त्याच्या उत्तम खेळीचे प्रदर्शन आहे. मोहम्मद अझहरोद्दीननंतर इंग्लंडमध्ये सलग सामन्यांमध्ये शतके झळकावणारा तोदुसरा भारतीय कर्णधार बनला आहे. १९९० मध्ये न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये अझहरोद्दीन आणि २०१४-१५ मालिकेत ऑस्ट्रेलियामध्ये विराट कोहलीनंतर सलग सेना कसोटीत शतके झळकावणारा तो तिसरा भारतीय कर्णधार आहे.

कर्णधारपदाच्या पदार्पणापासून फक्त स्टीव्हन स्मिथ (तीन) आणि अ‍ॅलिस्टर कुक (पाच) यांनीच सलग कसोटी सामन्यांमध्ये अधिक शतके झळकावली आहेत

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+