Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ind Vs Eng 1st ODI : इंग्लंड विरुद्ध भारत पहिला नागपूर वनडे, जाणून घ्या- प्लेइंग-11 अन् पीच अहवाल

India Vs England 1st Nagpur ODI Update : भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना आज खेळवलाल जाणार आहे. हा सामना गुरुवारी नागपूरच्या विदर्भ स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता प्रारंभ होईल. या मैदानावर दोन्ही संघ प्रथमच एकदिवसीय सामन्यात आमनेसामने येणार आहेत. चला तर जाणून घेऊया, या सामन्यासाठी दोन्ही संघाचे प्लेइंग 11 आणि पीचचा अहवाल कसा आहे.

टी-20 मालिकेत इंग्लंड संघाला 4-1 ने हरवल्यानंतर भारतीय संघात उत्साह आहे. गेल्या वर्षी संघाने फक्त 3 एकदिवसीय सामने खेळले. 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर ही मालिका महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत, कर्णधार रोहित शर्माला या मालिकेतूनच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी प्लेइंग कॉम्बिनेशन देखील ठरवता येणार आहे.

सामन्याची माहिती, पहिला एकदिवसीय सामना

  • तारीख: 6 फेब्रुवारी
  • स्थळ: विदर्भ क्रिकेट असोसिएशन, नागपूर
  • वेळ: नाणेफेक: दुपारी 1 वाजता
  • सामना सुरू: दुपारी 1.30 वाजता

India Vs England 1st Nagpur ODI Update

वरुण चक्रवर्ती पदार्पण करू शकतो

सामन्याच्या दोन दिवस आधी, गूढ फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीला टीम इंडियाच्या एकदिवसीय संघात समाविष्ट करण्यात आले. त्याने नागपूरमध्ये टीम इंडियासोबत सरावही केला. टी-20 मालिकेत वरुण 14 विकेट्स घेत मालिकावीर ठरला. त्याला नागपूरमध्ये संधी मिळू शकते. दरम्यान, शेवटच्या एकदिवसीय सामन्यासाठी संघात निवड झालेल्या जसप्रीत बुमराहला संघातून वगळण्यात आले आहे. बीसीसीआयने वरुणला समाविष्ट केल्यानंतर जाहीर केलेल्या संघात बुमराहचे नाव नाही.

इंग्लंडचा प्लेइंग-11

बेन डकेट, फिल साल्ट (यष्टीरक्षक), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद आणि साकिब महमूद.

भारताचा संभाव्य प्लेइंग-11

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल/ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर/अक्षर पटेल, कुलदीप यादव/वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी.

टॉस रोल आणि पिच रिपोर्ट

नागपूरची खेळपट्टी बहुतेकदा फलंदाजांना अनुकूल असते. येथे पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 288 धावा आहे. अशा परिस्थितीत, पहिला एकदिवसीय सामना उच्च धावसंख्या असलेला असू शकतो. सामन्यात फिरकीपटूंना मदत मिळू शकते. विदर्भ स्टेडियममध्ये आतापर्यंत ९ सामने खेळले गेले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ३ सामने जिंकले, तर नंतर फलंदाजी करणाऱ्या संघाने ६ सामने जिंकले.

येथे पहिला सामना 2009 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला होता. या स्टेडियममध्ये शेवटचा सामना २०१९ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला होता. जो भारताने 8 धावांनी जिंकला. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+