Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs AUS: विराट कोहलीच्या एका चुकीने यशस्वी जयस्वालचं शतकं हूकलं, नेमकी चूक कोणाची ?

IND vs AUS 4th Test Day 2: चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे. भारताने पाच गडी गमावून 164 धावा केल्या आहेत. भारत अजूनही ऑस्ट्रेलियापेक्षा 310 धावांनी मागे आहे. दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी यशस्वी जैस्वाल धावबाद झाला आहे. विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांच्यात धाव घेण्यावरुन गैरसमज स्पष्टपणे दिसून येत होता, परंतु चूक कोणाची आहे हे लक्षात येत नाही.

विराट कोहलीची चूक होती का?

साधारणपणे धावबाद झाल्यास जबाबदारी दोन्ही फलंदाजांचीअसते. कारण भागीदारीदरम्यान दोघांना एकमेकांच्या संकेतांचा आणि स्थितीचा अचूक अंदाज लावावा लागतो. विराट कोहली आणि यशस्वी जैस्वाल यांच्यातील रन आऊटच्या परिस्थितीत विराट कोहलीने यशस्वीला रनसाठी बोलावले, पण यशस्वीला त्याचा सिग्नल समजला होता की नाही, हे कदाचित तो रन करताना खात्री करू शकला नाही. त्यामुळे जैस्वाल धावबाद झाला.

yashasvi jaiswal run out

यशस्वी जैस्वाल झाला निराश

यशस्वी जैस्वालने शेवटच्या क्षणी आपली धाव थांबवली, त्यामुळे त्याला धावबाद व्हावे लागले. धावबाद झाल्याने त्याचे शतक झळकावण्याचे स्वप्नही संपुष्टात आलं. यशस्वी जैस्वाल बाद झाल्यानंतर विराट कोहलीही पॅव्हेलियनमध्ये परतला. दरम्यान विराट कोहली मैदानावर सेटल झाला होता आणि त्याला येथे सहज मोठी खेळी खेळता आली असती, पण तसे होऊ शकले नाही.

जैस्वाल आणि कोहली यांच्यात शतकी भागीदारी

रोहित शर्मा आणि केएल राहुल लवकर बाद झाल्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली यांनी शानदार भागीदारी केली. दोघांनी एकत्रितपणे संघाला धरून ठेवण्याचे काम केले. या दोन्ही जोडीने 102 धावांच्या भक्कम भागीदारीद्वारे भारताला स्थिर स्थितीत आणले. ही भागीदारी मोठी असू शकली असती, पण यशस्वी जैस्वालच्या घाई अंगलट आली. जैस्वाल वेगवान धावा करण्याचा प्रयत्न करत असताना तो धावबाद झाला. त्यामुळे ही भागीदारी तुटली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+