T20 World Cup 2026 : भारतीय संघाची घोषणा! 'SKY'चे कर्णधारपद कायम, किशनला मिळाली संधी!
T20 World Cup 2026 Team india announcement : भारतीय क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा आज संपली आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी (T20 World Cup 2026) अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती आज (शनिवारी दि. २० डिसेंबर) भारतीय संघाची घोषणा केली. या घोषणेत दिग्गज खेळाडू शुभमन गिलचा पत्ता कट झाला आहे. तर इशान किशनला संधी मिळाली आहे. तर संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादवच्या हाती आले आहे.

सूर्या कर्णधार, तर अक्षर पटेल नवा उपकर्णधार
अपेक्षेप्रमाणे सूर्यकुमार यादव याच्याकडेच नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. मात्र, सर्वात मोठा धक्का म्हणजे सलामीवीर शुभमन गिल याला १५ जणांच्या संघातून वगळण्यात आले आहे. गिलच्या खराब फॉर्ममुळे त्याच्या जागी आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिषेक शर्माला पसंती देण्यात आली आहे. तसेच, अक्षर पटेलची संघाचा नवा उपकर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
गिलची उपकर्णधारपदावरून गच्छंती?
शुभमन गिल गेल्या १५ डावांपासून पन्नास धावांसाठी झगडत आहे. त्यातच पायाच्या दुखापतीमुळे तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या सामन्यालाही मुकला होता. अशा परिस्थितीत त्याचा संघातून पत्ता कट करण्यात आला आहे.
इशान किशन आणि संजू सॅमसन: यष्टिरक्षकाची जागा कोणाची?
इशान किशनचे पुनरागमन!
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये (SMAT) झारखंडला विजेतेपद मिळवून देणाऱ्या इशान किशनने १० डावांत ५१७ धावा चोपल्या आहेत. १९५ च्या स्ट्राईक रेटने खेळणाऱ्या इशानने निवडकर्त्यांना विचार करण्यास भाग पाडले आहे.
संजू सॅमसन
संजूने अलीकडच्या काळात चांगली कामगिरी केली आहे, परंतु त्याला फलंदाजीच्या क्रमवारीत वारंवार बदल सहन करावे लागत आहेत. त्याला संधी मिळेल की राखीव खेळाडूंत ठेवले जाईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
ऋषभ पंत
तज्ज्ञांच्या मते, यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंतपेक्षा संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांच्या नावावर जास्त चर्चा सुरू आहे.
युवांना प्राधान्य: अभिषेक शर्मा आणि टिळक वर्मा 'इन'
संघात युवा खेळाडूंची फळी भक्कम दिसतेय. अभिषेक शर्माने आपल्या आक्रमक फलंदाजीने सलामीची जागा जवळपास निश्चित केली आहे. तर टिळक वर्मा तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी प्रबळ दावेदार मानला जात आहे. यशस्वी जयस्वाल आणि रिंकू सिंग यांना मुख्य संघात स्थान मिळते की त्यांना 'राखीव' (Standby) खेळाडूंच्या यादीत टाकले जाते, हा मोठा प्रश्न आहे.
गोलंदाजीची धुरा कोणाच्या खांद्यावर?
वेगवान गोलंदाजी : जसप्रीत बुमराहच्या सोबतीला अर्शदीप सिंग आणि हर्षित राणा हे वेगवान आक्रमण सांभाळतील.
फिरकीची जादू : कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती हे फिरकीचे मुख्य अस्त्र असतील, तर अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर अष्टपैलू खेळाडू म्हणून संघाला बळकटी देतील.
निवड समितीसमोर मोठे आव्हान!
घरच्या मैदानावर (भारत आणि श्रीलंका) हा विश्वचषक होत असल्याने भारतावर विजेतेपद राखण्याचे प्रचंड दडपण असेल. निवड समिती 'अनुभवा'ला महत्त्व देते की 'सध्याच्या फॉर्म'ला पाहून धाडसी निर्णय घेते, हे आज दुपारी स्पष्ट होईल.












Click it and Unblock the Notifications