IND vs PAK : पाकड्यांना हरवल्यानंतर मैदानात नाट्य! ट्रॉफी घेण्यास टीम इंडियाचा नकार, हे मोठ्ठं कारण
IND vs PAK Final Team India Refuses Trophy : आशिया कप २०२५ च्या फायनलमध्ये पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धडा शिकवत भारतीय संघाने नवव्यांदा विजेतेपद पटकावले, पण विजयानंतर जे घडले, ते क्रिकेटच्या इतिहासात अभूतपूर्व होते. भारतीय टीमने थेट पीसीबी आणि एसीसीचे अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्या हातून ट्रॉफी घेण्यास स्पष्ट नकार दिला. विशेष म्हणजे टीम इंडियातील खेळाडूंमध्ये देशाभिमान आणि पहलगाम हल्ल्याचा संताप डोळ्यात दिसत होता. भारतीय संघाने जे केले त्यातून पाकड्यांना आणि जगाला जो संदेश द्यायचा तो बरोब्बर पोहचला.
मोहसीन नकवीकडून ट्राॅफी न स्वीकारण्याच्या निर्णयामुळे संपूर्ण प्रेझेंटेशन सोहळ्याला सवा तासाहून अधिक विलंब झाला आणि दुबईच्या मैदानावर पाकिस्तानची मोठी नामुष्की झाली.

प्रोटोकॉल मोडला: नकवींसोबत ट्रॉफी नकोच!
मोहसिन नकवी हे एशियन क्रिकेट कौन्सिलचे (ACC) अध्यक्ष असल्याने प्रोटोकॉलनुसार त्यांना ट्रॉफी प्रदान करणे अपेक्षित होते. मात्र, भारतीय खेळाडूंनी नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला.
काय आहे नकाराचे कारण?
नकवी यांनी 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि त्यापूर्वी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून भारतीय टीमला डिवचणाऱ्या पोस्ट्समुळे (उदा. फायटर जेट पाडण्याच्या अंदाजात रोनाल्डोचा फोटो) टीम इंडिया नाराज होती. टीमचे म्हणणे होते की, "आम्ही ट्रॉफी नक्कीच घेऊ, पण ती नकवी यांच्या व्यतिरिक्त कोणाकडूनही घेऊ."
मैदानावरील नाट्यमय घडामोडी
मोहसिन नकवी प्रोटोकॉलचे कारण देत ट्रॉफी देण्यासाठी बराच वेळ व्यासपीठावर उभे राहिले. भारतीय संघ ट्रॉफी घेण्यासाठी आला नाही, तसेच पाकिस्तानचा संघही रनरअप मेडल घेण्यासाठी त्वरित आला नाही, त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. मैदानात उपस्थित प्रेक्षकांनी मोहसिन नकवी यांना आपला संताप व्यक्त केल्याचे वृत्त आहे. विशेष म्हणजे, सामना संपल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये हात मिळवण्याची औपचारिकताही झाली नाही.
ट्रॉफीशिवायच 'पोडियम फोटो'काढला
सवा तासाच्या विलंबानंतर अखेर वैयक्तिक पुरस्कार देण्याचा सोहळा पार पडला. शिवम दुबे, कुलदीप यादव, तिलक वर्मा आणि अभिषेक शर्मा यांना प्रायोजकांच्या वतीने वैयक्तिक बक्षिसे मिळाली. पाकिस्तानी खेळाडूंना रनरअप पदके देण्यात आली. मात्र, भारतीय संघाच्या खेळाडूंनी ट्रॉफीशिवायच पोडियमवर जाऊन ग्रुप फोटो काढला आणि मैदानात उपस्थिती दर्शवली. कर्णधार सूर्यकुमार यादव यांनीही ट्रॉफी नाकारल्यामुळे प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये बोलण्यासाठी येण्यास नकार दिला.
Undefeated ✅
— BCCI (@BCCI) September 29, 2025
Dominating ✅
Victorious ✅#TeamIndia's #AsiaCup2025 campaign was pure mastery 🏆 😎 pic.twitter.com/kkM1jM7gtD
BCCI कडून ऐतिहासिक बक्षीस जाहीर
भारतीय टीमने घेतलेल्या या धडाकेबाज भूमिकेनंतर, आणि नवव्यांदा आशिया कप जिंकल्याबद्दल बीसीसीआयने आपल्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफवर मेहेरबान होत मोठी घोषणा केली. बीसीसीआयने भारतीय संघ आणि सपोर्ट स्टाफसाठी ₹२१ कोटींच्या बक्षीस रकमेची घोषणा केली आहे.
-
Devendra Fadnavis : गॅस टंचाईची भीती हा काँग्रेसचा कुटील डाव; देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप -
Horoscope Today March 13 2026 : 'या' राशींच्या आयुष्यात आर्थिक लाभ अन् खास बदल, वाचा आजचे राशीभविष्य -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
लोकनेते यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती; जाणून घ्या त्यांचे 5 ऐतिहासिक निर्णय; शेअर करा अभिवादन संदेश -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
29 वर्षांपूर्वीची दुखापत अन् सक्तीची विश्रांती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर शस्त्रक्रिया! -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
सोनं झालं स्वस्त! युद्ध असूनही भावात मोठी घसरण का?; वाचा मुंबई, पुणे अन् नागपूरचे आजचे ताजे दर -
ना पाणी, ना लिफ्ट; असुविधांचा डोंगर! म्हाडाच्या प्लॅटधारकांचा टाहो; रजिस्ट्रीची घाई पण सोयींची वाणवा -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास










Click it and Unblock the Notifications