भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली; 12 वर्षानंतर मायदेशात टीम इंडिया पराभूत
India Vs New Zealand 2nd Test : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावली आहे. पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा न्यूझीलंडकडून 113 धावांनी पराभव झाला. भारतीय संघाने 12 वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावली आहे. संघाचा शेवटचा पराभव 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध झाला होता.
मिळालेल्या या विजयाने न्यूझीलंड संघाची 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शेवटचा सामना खेळवला जाणार आहे.

भारताला केवळ 245 धावा करता आल्या
शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी 359 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाला दुसऱ्या डावात केवळ 245 धावा करता आल्या. न्यूझीलंडने दुसऱ्या डावात 255 धावा केल्या. पहिल्या डावात किवींनी 259 धावा केल्या आणि भारताने 156 धावा केल्या. मिचेल सँटनरने पहिल्या डावात 7 तर दुसऱ्या डावात 6 बळी घेतले.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप.
न्यूझीलंड: टॉम लॅथम (कर्णधार), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, टिम साऊदी, मिचेल सँटनर, एजाज पटेल, विल्यम ओ'रुर्के.












Click it and Unblock the Notifications