Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ind vs Ban : शमीने रचलेल्या पायावर गिलने चढवला कळस; भारताने जिंकलेल्या सामन्याचे तीन मुद्दे

चॅम्पियन ट्राँफी-२०२५ च्या भारताच्या आजच्या पहिल्याच सामन्यात, बांगलादेशचा सहा गड्यांनी पराभव झाला. भारताने या मालिकेचा आज विजयाने श्रीगणेशा केला. मात्र सुरुवातीला सोप्पा वाटणारा भारताचा पेपर चार विकेट पटापट पडल्याने अवघड झाला होता. मात्र शुभमन गिल आणि लोकेश राहुल या जोडीने हा विजय साकारला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर रंगलेल्या या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत २२८ धावा केल्या होत्या. या सामन्यातील पाच महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात...

ind vs ban champions trophy 2025

बांगलादेशची झुंज

या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी केली. तौहिद हृदयॉयने आपले पहिले शतक झळकावले. हृदयॉयने जाकेर अलीसोबत १५४ धावांची भागीदारी करून बांगलादेशला संकटातून बाहेर काढले. एकेकाळी बांगलादेशची धावसंख्या ३५/५ होती. परंतु जाकीर ६८ धावांवर बाद होण्यापूर्वी तौहिद आणि जाकेरने १८९ धावांची भागीदारी केली. तोपर्यंत, या जोडीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सहाव्या विकेटसाठी सर्वाधिक भागीदारीचा विक्रम केला होता. सहाव्या विकेटसाठी कोणत्याही देशाकडून एकदिवसीय सामन्यात भारताविरुद्ध ही सर्वोच्च भागीदारी आहे.

तौहिकची शानदार कामगिरी

पहिल्याच चेंडूवर स्लिपमध्ये झेल सोडल्यानंतर हृदयॉयने त्याच्या दुसऱ्या आयुष्यातील सर्वोत्तम कामगिरी केली. रोहित शर्माने स्लिपमध्ये त्याचा कॅच ड्रॉप केल्यामुळे अक्षर पटेलला हॅटट्रिक करता आली नाही . फिरकी गोलंदाजाने सलग चेंडूत तन्झिद हसन आणि मुशफिकुर रहीम यांचे बळी घेतले. नंतर हृदयॉयचाही कॅच उडाला होता.

शमीचे पाच बळी

पहिल्या डावात भारताकडून मोहम्मद शमीने पाच विकेट घेतल्या. खेळादरम्यान किमान दोनदा दुखापतींमुळे त्याला उपचार घ्यावे लागले असले तरी, त्याने आज जोरदार पुनरागमन करत पाच विकेट घेतल्या. मोहम्मद शमीने सौम्य सरकार आणि मेहदी हसन मिराज यांचे बळी घेतले. हर्षित राणाने कर्णधार नजमुल शांतोचा बळी घेतला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर, बांगलादेशने त्यांच्या डावाची सर्वात वाईट सुरुवात केली. पहिल्या षटकात एक धाव असताना त्यांची पहिली विकेट गमावली आणि नंतर दुसऱ्या षटकात फक्त दोन धावा असताना त्यांची दुसरी विकेट गमावली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+