Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सिडनी कसोटीतून रोहित बाहेर, कोहली,गिल,पंत आणि सिराजही फॉर्मात नाही ,फक्त रोहितलाच शिक्षा का?

IND vs AUS: सिडनी येथे सुरु असलेल्या भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया यांच्या पाच मालिकेतील अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर आहे. त्याच्या जागी शुभमन गिलचा संघात समावेश करण्यात आला.

नाणेफेक करण्यासाठी आलेल्या जसप्रीत बुमराहने रोहित शर्माबद्दल अपडेट देत सांगितले की, रोहित शर्माने या कसोटीत विश्रांती देण्यासाठी स्वत:ला बाहेर ठेवले आहे. यावरून संघात किती एकता आहे हे दिसून येते. रोहित शर्माला विश्रांती देणे हे एक निमित्त असल्याचे दिसून येते.

Rohit Sharma

मेलबर्न कसोटीनंतर भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये बरेच काही घडले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्येही काही गोष्टी समोर आल्या होत्या. रोहित शर्माला कर्णधारपद मिळाल्यानंतर वगळण्यात आले पण इतर अनेक खेळाडूही फॉर्ममध्ये नाहीत. कोहलीही फॉर्मात नाही.

पर्थ कसोटीत कोहलीने शतक झळकावले होते. त्यानंतर तोही फ्लॉप ठरला आहे. मोहम्मद सिराजची ही परिस्थिती आहे. दोघेही मैदानावर ऑस्ट्रेलियन खेळाडूंशी भांडताना दिसले आहेत. कोहलीला प्लेइंग इलेव्हनमधूनही वगळले जाऊ शकतं होतं. दोष फक्त रोहितवर पडला आहे. त्याच्याशिवाय ऋषभ पंतचाही खेळ खूपच खराब झाला आहे. संघाला गरज असताना खराब शॉट्स खेळून तो बाद होत आहे. पंतला संघातून वगळण्यात आलं असतं तर जुरेल संघात संधी मिळाली असती.

कोहली सतत फ्लॉप

कोहली गेल्या पाच वर्षांत त्याच्या कामगिरीत सुधारणा करू शकला नाही, त्याची कसोटी सरासरीही जडेजापेक्षा कमी आहे. या पाच वर्षांत कोहलीने 3 शतकी खेळी केल्या आहेत. या कामगिरीच्या जोरावर त्याला संघातून फार पूर्वीच वगळायला हवे होते. 31 च्या सरासरीने धावा करणारा खेळाडू इतके दिवस संघात राहिला हा एक मोठा प्रश्न आहे.

रोहितची कसोटी कारकीर्द संपली?

शेवटच्या दहा कसोटी डावांवर नजर टाकली तर रोहित शर्मा आता कसोटी संघात नसावा अशी कामगिरी राहिली आहे. त्याची सरासरी 11 आहे. टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध पराभूत झाली आणि ऑस्ट्रेलियात दोन कसोटी गमावल्यानंतर WTC फायनलमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे. रोहित वनडे मालिकेसाठी एक चांगला फलंदाज आहे आणि आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी त्यात महत्त्वाची राहणार आहे.

सिडनी कसोटीवर या बदलाचा कोणताही परिणाम झाला नाही. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून लंचब्रेकपर्यंत तीन विकेट गमावल्या होत्या. यशस्वी जैस्वाल 10 धावा करून बाद झाला तर केएल राहुल 4 धावा करून बाद झाला. गिलने 20 धावा केल्या आणि पहिल्या सत्राच्या शेवटच्या चेंडूवर तो बाद झाला, त्यानंतर विराट कोहली 17 धावा करुन बाद झाला. वृत्त लिहीपर्यंत भारताची धावसंख्या 76/4 अशी झाली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+