IND vs AUS: ऋषभ पंतचं वादळी अर्धशतक! कसोटी सामन्याला टी-20 फिवर, षटकार मारत अर्धशतक केलं पूर्ण
IND vs AUS Rishabh Pant: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेतील 5 वा आणि शेवटचा सामना अतिशय रोमांचक वळणावर पोहोचला आहे. भारताचा पहिल्या दिवसाचा अवघ्या 185 धावांवर आटोपला.
ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात 181 धावा केल्या आणि भारताला केवळ 4 धावांची किरकोळ आघाडी मिळाली. दुस-या डावात टीम इंडियाने 146 धावा करत 6 विकेट गमवल्या आहेत.

फोटो सौजन्य- पीटीआय
पंतचं वादळी अर्धशतक
दुसऱ्या दिवशी फलंदाजीला आलेला भारतीय संघ 4 विकेट्स गमावून संघर्ष करत होता, मात्र ऋषभ पंतने वादळी खेळी करत अवघ्या 29 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केलं. ऋषभ पंतने मिचेल स्टार्कच्या चेंडूवर षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केलं. पंतने आपल्या वादळी खेळीमूळे तो सर्वात वेगवान अर्धशतक करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.
या डावात पंतने 29 चेंडूत अर्धशतक झळकावून सामन्याला टी-20 फिवर दिला. संघ संकटात असताना पंतच्या स्फोटक फलंदाजीने भारतीय संघाला मोठा दिलासा मिळाला आहे. पंतच्या या आक्रमक फलंदाजीने विरोधी गोलंदाजांवर दबाव आणला आणि कसोटी सामना रोमांचक झाला. ऋषभ पंतने 61 धावांची खेळी केली, त्यानंतर तो पॅट कमिन्सच्या चेंडूवर बाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये परतला.
विराट कोहलीने पुन्हा केली निराशा
दुसरीकडे सिडनी कसोटीच्या दुसऱ्या डावात विराट कोहलीची कामगिरी पुन्हा एकदा निराशाजनक ठरली. या मालिकेत तो पाचव्यांदा ऑस्ट्रेलियन गोलंदाज स्कॉट बोलंडचा बळी ठरला. कोहलीचा पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू चुकला आणि तो स्लिपमध्ये झेलबाद झाला. यावेळी त्याने केवळ 6 धावा केल्या. विराट कोहलीच्या निराशाजनक कामगिरीने त्यांच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.












Click it and Unblock the Notifications