भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतल्यास कोणत्या संघाला मिळणार संधी? घ्या जाणून
मु्ंबई - चॅम्पियन्स ट्रॉफी अवघ्या सात महिन्यांवर येऊन ठेपली आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. पण ही स्पर्धा पाकिस्तानात होत असल्याने भारतीय संघ खेळण्याची शक्यता कमी आहे. भारत सरकारच्या ध्येयधोरणावर हा नि्र्णय अवलंबून आहे. त्यामुळे जर भारतीय संघ पाकिस्तानात चॅम्पियन ट्राॅफीत न खेळल्यास आयसीसी कोणत्या संघाला संधी देणार ते आपण जाणून घेऊया.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल तमाम भारतीयांत उत्सुकता आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाकडून जोरदार तयारी सुरू आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाखाली आणि रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडिया या स्पर्धेत उतरणार आहे. जय शाह यांनी रोहित शर्मा या स्पर्धेत कर्णधार असेल हे स्पष्ट केलं आहे. पण सर्वात मोठी अडचण अशी आहे की ही स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे.

भारत चॅम्पियन स्पर्धेत खेळणार का?
भारत आणि पाकिस्तानचे संबंध पाहता भारत पाकिस्तानात खेळेल का हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पाकिस्तानकडून वारंवार होणारी दहशतवादी कृत्य पाहून भारताने पाकिस्तानसोबतचे सर्व संबंध तोडून टाकले आहेत. त्यामुळे भारतीय आणि पाकिस्तानी भुभागात सोळा वर्षांपासून या उभय संघात सामने झालेले नाहीत. त्यामुळे भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात जाणार की नाही हा प्रश्न आहे.
भारत या स्पर्धेत खेळण्यासाठी पाकिस्तानात जाईल की, नाही हे आताच सांगता येणार नाही. बीसीसीआयही यासंदर्भात अधिकृत स्पष्टता देण्यात आली नाही. तसेच भारतीय विदेशी नितीचा आणि मागील सोळा वर्षांचा अनुभव पाहता भारत पाकिस्तानात जाण्याची शक्यता कमीच आहे.
हायब्रिड माॅडेल अवलंबवल्यास...
आशिया कप स्पर्धेत भारतीय संघ हायब्रिड मॉडेलवर खेळला होता. तेव्हा भारताचे सर्व सामने श्रीलंकेत झाले होते. त्याच पार्श्वभूमीवर काहीतरी तोडगा निघेल अशी क्रीडाप्रेमींना अपेक्षा आहे. पण ही स्पर्धा पाकिस्तानातच झाली आणि भारतीय संघाने खेळण्यास नकार दिला तर पुढचं गणित कसं असेल? जाणून घेऊयात.
..तर श्रीलंका संघाला संधी
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हायब्रिड मॉडेलवर स्पर्धा करण्यास नकार दिला तर मात्र टीम इंडिया या स्पर्धेतून बाहेर पडू शकते. भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार घेतली तर वेळापत्रकात उलथापालथ होईल. यासाठी आयसीसीला आठव्या संघ शोधावा लागेल.आयसीसीच्या टाॅप आठ संघात श्रीलंका स्थान मिळवू शकली नाही. गुणतालिकेत श्रीलंकनं संघ नवव्या स्थानावर आहे. त्यामुळे भारत या स्पर्धेत न खेळल्यास आयसीसी यासाठी श्रीलंकेला स्पर्धेत संधी देऊ शकते.
19 फ्रेबुवारीपासून स्पर्धेला सुरुवात
प्रारुप वेळपत्रकात भारताऐवजी श्रीलंकन संघ येईल. तसेच भारताचे सामने ज्या दिवशी आयोजित केले आहेत. तिथे श्रीलंकेला संधी दिली जाईल. म्हणजेच अ गटात पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश आणि न्यूझीलंड हे संघ राहतील. प्रारुप वेळापत्रकानुसार 19 फ्रेबुवारीपासून स्पर्धेला सुरुवात होईल. तसेच 9 मार्चला अंतिम सामना असणार आहे. तसेच 10 मार्च हा राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
-
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
IND vs NZ: बुमराह, अन् अक्षरचा फायनलमध्ये जलवा; न्युझीलंडच्या फलंदाजांना कसं केलं गारद? वाचा -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
"सुप्रीम कोर्टात फक्त बंगालचीच प्रकरणे आहेत का?"; पश्चिम बंगाल SIR प्रकरणावर सरन्यायाधीशांचा संताप -
घरगुती सिलिंडर बुकिंगच्या नियमांत मोठा बदल; साठेबाजी रोखण्यासाठी सरकारने घेतला हा निर्णय -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
लाडकी बहीण होणार 'लखपती'; बिनव्याजी कर्ज आणि व्यवसायाची संधी, मुख्यमंत्र्यांनी मांडला मेगा प्लॅन!










Click it and Unblock the Notifications