Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

काय आहे 'चॅम्पियन ट्रॉफी'चा इतिहास..? किती स्पर्धा झाल्या? सर्वाधिक धावा कुणाच्या? विकेट कुणाच्या?

सध्या जगभरातील क्रिडा विश्वात आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी-२०२५ ची चर्चा सुरु आहे. यंदाच्या आयसीसी चॅम्पियन ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे. ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने खेळविण्यात येणार असून भारतीय संघाचे सर्व सामने युएईमध्ये खेळवले जाणार आहेत. १९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन ट्रॉफीला सुरुवात होईल. या स्पर्धेमध्ये ८ संघ सहभागी झाले आहेत. २०२५ चा आयसीसी चॅम्पियन कोण होणार हे ९ मार्च रोजी जगाला कळेल. परंतु चॅम्पियन ट्रॉफीच्या इतिहासामध्ये कोणते संघ विजेते झालेत, कुणी रेकाँर्ड केलेय, इतिहास काय आहे, यावर एकदा नजर टाकूयात...

Champions Trophy 2025

पहिली स्पर्धा

आयसीसी चॅम्पिअन ट्राँफीची सुरुवात १९९८ मध्ये झाली. ती बांगलादेशमध्ये खेळवण्यात आली. या स्पर्धेचा फायनल सामना दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात झाला. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा ४ विकेटने पराभव करून पहिले विजेतेपद आपल्या नावावर केले होते.

दुसरी स्पर्धा

चॅम्पियन ट्रॉफीची दुसरी स्पर्धाआ२००० साली खेळण्यात आली होती. यामध्ये दुसऱ्या सीझनचे जेतेपद न्यूझीलंडच्या संघाने जिंकले होते. विजेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडने भारताचा ४ विकेट्स राखून पराभव केला.

तिसरी स्पर्धा

चॅम्पियन ट्रॉफीचा पुढचा सिझन २००२ मध्ये झाला होता. या स्पर्धेचे आयोजन श्रीलंकेमध्ये करण्यात आले होते. त्या वर्षी सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आणि श्रीलंका यांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले. वास्तविक, पावसामुळे अंतिम सामना होऊ शकला नव्हता.

चौथी स्पर्धा

२००४ मध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीचे आयोजन इंग्लंडमध्ये करण्यात आले होते. यावेळी चॅम्पियन ट्रॉफी वेस्ट इंडिजच्या संघाने नावावर केली होती. रोमहर्षक फायनलमध्ये वेस्ट इंडिजने यजमान इंग्लंडचा २ गडी राखून पराभव केला.

पाचवी स्पर्धा

चॅम्पियन्स ट्रॉफीचा पाचवा हंगाम २००६ मध्ये भारतात झाला. त्यानंतर जेतेपदाच्या लढतीत वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया आमनेसामने होते. मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने ८ गडी राखून विजय मिळवला होता.

सहावी स्पर्धा

२००९ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीही ऑस्ट्रेलियाने जिंकली होती. स्पर्धेचा सहावा मोसम दक्षिण आफ्रिकेत झाला. ऑस्ट्रेलियाने विजेतेपदाच्या लढतीत न्यूझीलंडचा ६ विकेटने पराभव केला होता. सलग दोन चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा ऑस्ट्रेलिया हा एकमेव संघ आहे.

सातवी स्पर्धा

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०१३ मध्ये इंग्लंडमध्ये खेळलेली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. भारताने अंतिम फेरीत इंग्लंडचा ५ धावांनी पराभव केला. भारत आणि ऑस्ट्रेलियाने प्रत्येकी दोनदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. मात्र, संयुक्त विजेते असूनही जेतेपद पटकावणारा भारत हा या स्पर्धेतील एकमेव संघ आहे.

आठवी स्पर्धा

चॅम्पियन्स ट्रॉफीची आठवी आवृत्तीही २०१७ साली इंग्लंडमध्येच झाली. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेतेपदाची लढत झाली. पाकिस्तानने भारताचा १८० धावांनी पराभव करून पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकली.

नववी स्पर्धा

आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) अलिकडेच चॅम्पियन्स ट्रॉफीची नववी स्पर्धा जाहीर केली आहे. ती पाकिस्तानमध्ये हायब्रिड मॉडेल अंतर्गत खेळवली जाईल. २०१७ नंतर पहिल्यांदाच ही मोठी स्पर्धा होणार आहे.

कुणी केल्या सर्वाधिक धावा ?

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ख्रिस गेलच्या नावावर आहे. या माजी कॅरिबियन फलंदाजाने १७ सामन्यांमध्ये ५२.७३ च्या सरासरीने ७९१ धावा केल्या, ज्यात ३ शतकांचा समावेश आहे. महेला जयवर्धनेने २२ सामन्यांमध्ये ४१.२२ च्या सरासरीने ७४२ धावा केल्या. त्याने ५ अर्धशतके ठोकली. या यादीत शिखर धवन तिसऱ्या स्थानावर आहे, ज्याने ७७.८८ च्या सरासरीने ७०१ धावा केल्या आहेत.

कुणी घेतल्या सर्वाधिक विकेट्स?

या स्पर्धेच्या इतिहासात न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज काइल मिल्स हा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. त्याने १५ सामन्यांमध्ये १७.२५ च्या सरासरीने २८ विकेट्स घेतल्या. श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने ३०.६४ च्या सरासरीने २५ विकेट्स घेतल्या आहेत. मुथय्या मुरलीधरनने २०.१६ च्या सरासरीने २४ विकेट्स घेतल्या. भारतीय गोलंदाजांबद्दल बोलायचे झाले तर रवींद्र जडेजाने १० सामन्यांमध्ये २५.१८ च्या सरासरीने १६ विकेट्स घेतल्या आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+