Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs NZ Final: भारत- न्यूझीलंड मॅचमध्ये पाऊस आला तर? काय आहे 'रिझर्व डे'चा नियम; वाचा

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी- २०२५ च्या फायनलसाठी भारत- न्यूझीलंड यांच्यात लढत होणार आहे. रविवारी ९ मार्चला दुबईच्या आंतरराष्ट्राय स्टेडिअमवर हा सामना होणार आहे. लढतीसाठी मैदान सज्ज झाले आहे. परंतु या लढतीपूर्वी हवामानाबद्दल चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत यापूर्वी दोन सामने पावसामुळे रद्द करावे लागले आहेत. लढती रद्द झाल्याच्या फटका काही संघांना बसला. पॉइंट्स टेबलवरही त्याचा परिणाम झाला. अशा परिस्थितीत अंतिम सामन्यात पाऊस आला तर चॅम्पियन कोण होईल आणि आयसीसीने यासाठी कोणते नियम बनवले आहेत ते आपण जाणून घेऊयात.

India vs New Zealand Final Match

एक दिवस ठेवला राखील?

अॅक्युव्हेदरच्या अहवालानुसार, ९ मार्चला दुबईत पावसाची शक्यता कमी आहे. मात्र तरीही पाऊस आलाच तर आयसीसीने अंतिम सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवलेला आहे. अंतिम सामन्यांतील दोन्ही संघाबाबत बोलायचे झाल्यास टीम इंडिया आत्तापर्यंत या स्पर्धेत अपराजित राहिली आहे. तर न्यूझीलंडला भारताकडून एकमेव पराभव स्विकारावा लागला आहे. आता अंतिम सामन्यात न्यूझीलंड गेल्या पराभवाचा बदला घेण्यासाठी उत्सुक आहे. तर भारत आपला अपराजीत लय कायम ठेवण्यास उत्सुक आहे.

नॉकआउट नियम काय आहे

सामना ९ मार्च रोजीच पूर्ण करण्यासाठी आयसीसी कडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. सामना पावसामुळे प्रभावित झाला, तर डकवर्थ लुईस पद्धतीने खेळण्याची तरतूद आहे परंतु त्यासाठी किमान निर्धारित षटकांचा खेळ व्हायला हवा. याशिवाय, जर पावसामुळे सामना सुरू होऊ शकला नाही किंवा मध्येच थांबवला गेला, तर सामना पुन्हा राखीव दिवशी म्हणजेच १० मार्च रोजी सुरू केला जाईल.

फक्त अंतिम सामन्यासाठी राखीव दिवस

आयसीसीने चॅम्पियन ट्राँफीच्या फक्त अंतिम सामन्यासाठी एक दिवस राखीव ठेवला आहे. परंतु त्यापूर्वी झालेल्या दोन उपांत्य फेरीतील सामन्यासाठी असा दिवस राखून ठेवण्यात आलेला नव्हता. म्हणजेत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दुबईतील किंवा न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण अफ्रिका या लाहोरमधील सामन्यांत पाऊस आला असता व पावसामुळे उपांत्य फेरीचा सामना रद्द झाला, तर अशा परिस्थितीत पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेला संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला असता.

इतिहासातही विभागून विजेतेपद

चॅम्पियन्स ट्रॉफीची सुरुवात १९९८ मध्ये झाली. मात्र २००२ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात पावसाने व्यत्यत आणला होता. पावसामुळे अंतिम सामना नियोजित वेळेनुसार खेळवता आला नाही. दुसऱ्या दिवशीही पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही, त्यानंतर भारत आणि श्रीलंका यांना संयुक्त विजेते घोषित करण्यात आले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+