Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

HEAD TO HEAD : IND vs NZ मध्ये उद्या टशन; समोरासमोरचे आकडे आहेत धक्कादायक, काय होईल? वाचा

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी- 2025 मध्ये शेवटच्या साखळी सामना उद्या (रविवारी) भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. दुबईत आंतरराष्ट्रीय क्रिकेटस्टेडिअमवर दुपारी 2:30 वाजता तो खेळला जाईल. हा सामना जिंकून, दोन्ही संघांना ग्रुप अ मध्ये अव्वल स्थानावर राहायचे आहे. ज्यामुळे त्यांना सेमीफायनलमध्ये ग्रुप ब मधील दुसऱ्या क्रमांकाच्या संघाशी सामना करण्याची संधी मिळेल. परंतु या सामन्यापूर्वी भारत व न्यूझिलंड यांच्यातील चॅम्पियन ट्राँफीत झालेल्या सामन्यांचा इतिहास पाहिला तर, न्यूझिलंडची बाजू वरचढ ठरते. काय आहे सामन्याचं हेड टू हेड गणित? तेच आपण पाहूयात...

India vs New Zealand Head to Head

किती वेळा आले समोरासमोर?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आयसीसी एकदिवसीय सामन्यांच्या आकडेवारीबद्दल बोललो, तर न्यूझीलंडचे भारतावर वर्चस्व आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषकात या दोन्ही संघांमध्ये एकूण ११ सामने खेळले गेले आहेत. या काळात टीम इंडियाने 5 सामने जिंकले आहेत आणि न्यूझीलंडनेही 5 सामने जिंकले आहेत. तर 1 सामना अनिर्णीत राहिला. याशिवाय आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात एक सामना खेळला गेला आहे. ज्यामध्ये न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. आयसीसी एकदिवसीय स्पर्धेत 12 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 5 सामने भारताने जिंकले आहेत आणि 6 सामने न्यूझीलंडने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत या दोघांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळणार आहे.

कशी आहे दोघांची सरासरी?

भारताने केलेला सर्वोच्च धावसंख्या - 397
न्यूझीलंडने केलेला सर्वोच्च धावसंख्या - 327
भारताने केलेली सर्वात कमी धावसंख्या - 150
न्यूझीलंडने केलेला सर्वात कमी धावसंख्या - 146

एकूण कामगिरी कशी?
या दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या एकूण एकदिवसीय सामन्यांबद्दल बोलायचे झाल्यास, तेथे मात्र भारताची बाजू वरचढ दिसते. भारत आणि न्यूझीलंड यांनी आत्तापर्यंत 118 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या काळात भारताने 60 सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने 50 सामने जिंकले आहेत. या दोघांमधील 7 सामने अनिर्णीत राहिले. 1 सामना बरोबरीत सुटला. गेल्या 5 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताने न्यूझीलंडला पराभूत केले आहे.

कसा होता शेवटचा सामना?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील शेवटचा एकदिवसीय सामना 15 नोव्हेंबर रोजी आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये खेळला गेला होता. जिथे भारताने उपांत्य फेरीत न्यूझीलंडला हरवले होते. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 4 गडी गमावून 397 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ 327 धावांवर सर्वबाद झाला आणि भारताने हा सामना ७० धावांनी जिंकला होता. मात्र एकमेव झालेल्या चॅम्पियन ट्राँफीतील सामन्यात भारला पराभूत व्हावे लागले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+