ते दुबई आहे, आमचं घर नाही... कॅप्टन रोहित शर्मा भडकला; टीम इंडियावर नेमका काय झालाय आरोप? वाचा
चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला उपांत्य सामना उद्या मंगळवारी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला जाईल. या सामन्या पूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पत्रकार परिषदेला आला. टीम इंडियाला दुबईच्या मैदानाचा फायदा मिळतोय का, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर रोहितने चोख प्रत्युत्तर दिले. चॅम्पियन ट्राँफीचे टीम इंडियाचे सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळविण्यात येत आहेत. त्यामुळे काही संघांनी टीम इंडियाला पिचचा अंदाज आल्याचा आरोप केला होता. त्यानंतर रोहितला हा प्रश्न विचारण्यात आला.

काय आहे टीम इंडियावर आरोप?
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर आयसीसीने ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने घेण्यास परवानगी दिली. त्यानुसार भारताचे सर्व सामने दुबई येथील आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळविण्यात येत आहेत. यजमान पाकिस्तानलाही भारताविरुद्ध गट फेरीतील सामना खेळण्यासाठी दुबईला यावे लागले. यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, त्यांच्या मते इतर संघ वेगवेगळ्या मैदानांवर खेळत आहेत तर भारत फक्त एकाच मैदानावर खेळणार आहे. याचा फायदा भारतीय संघाला होत असल्याचा आरोप काही देशातील खेळाडूंनी केला होता.
रोहितला काय विचारला प्रश्न?
टीम इंडियाला स्पर्धेत फक्त एकाच ठिकाणी खेळायचे आहे. त्यांना प्रवासही करावा लागणार नाही. इतर संघांना मात्र पाकिस्तान आणि दुबई असा प्रवास करावा लागतोय. याचा फायदा टीम इंडियाला मिळतोय का, असा प्रश्न पत्रकार परिषदेत कर्णधार रोहित शर्माला विचारण्यात आला. त्यावर रोहितनेही समर्पक उत्तर दिले.
काय म्हणाला रोहीत?
या प्रश्नावर रोहित म्हणाला, "दुबई आमचे घर नाही. आम्हाला खेळपट्टीबद्दलही माहिती नाही. या खेळपट्ट्यांवर काय होणार आहे, हे माहित नसते. उपांत्य फेरीत कोणती खेळपट्ट्या वापरली जाणार आहे, हेही आम्हाला माहित नाही. आम्हाला जुळवून घ्यावे लागेल. ते आमचे घरही नाही, ते दुबई आहे. आम्हीही येथे जास्त सामने खेळत नाही. ते आमच्यासाठीही नवीन आहे.
तिन्ही वेळेस वेगळी स्थिती
रोहित शर्मा पुढे म्हणाला, "आमच्या संघाने खेळलेल्या ३ सामन्यांमध्ये खेळपट्टी सारखीच होती. परंतु सर्व सामन्यांमध्ये तिने वेगवेगळ्या बाँलिंगला साथ दिली. न्यूझीलंडविरुद्ध, आम्ही पाहिले की जेव्हा त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी गोलंदाजी केली तेव्हा चेंडू स्विंग आणि सीम झाला. गेल्या दोन सामन्यांमध्ये, आमचे गोलंदाज प्रथम गोलंदाजी करत होते. पण गोलंदाजांना तेवढी साथ मिळाली नाही. संध्याकाळी, येथे हवामान थोडे थंड असते. त्यामुळे चेंडू स्विंग होण्याची शक्यता असते. प्रत्येक विकेट कशी वागेल हे आम्हाला माहित नसते. दिसायला ती सारखीच असते, मात्र खेळताना ती वेगळे रुप धारण करते.












Click it and Unblock the Notifications