भारत-पाकिस्तानचे पुढील तीन वर्षांच्या सामन्यांबाबत मोठी अपडेट; आयसीसीने घेतला 'हा' मोठा निर्णय
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेबाबत आता नवीन अपडेट समोर आली आहे. आयसीसीने या स्पर्धेसाठी हायब्रिड माँडेलला मान्यता दिली असून, भारताचे सामने आता त्रयस्त ठिकाणी होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. आयसीसीच्या या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला चांगलाच झटका बसला असल्याचे बोलले जात आहे. आयसीसीने सोशल मीडियावर ही माहिती आज जाहीर केली.

आयसीसीचा मोठा निर्णय
आयसीसीने आज भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्यांबाबत पुढील तीन वर्षांचा निर्णय जाहीर केला. 2024 ते 2027 या वर्षांत भारत-पाकिस्तान यांच्यात होणारे सामने हे हायब्रिड पद्धतीने खेळविण्यात येणार असल्याचे आयसीसीने सांगितले. म्हणजेच या दोन्ही देशांमधील एकमेकांचे सामने हे यापुढे त्रयस्त देशात खेळविले जाणार आहे. हा निर्णय आयसीसीच्या पुढील तीन वर्षांच्या सर्व सामन्यांना लागू होईल. त्याच चॅम्पियन ट्राँफीचाही समावेश आहे.
JUST IN: ICC issues update on Champions Trophy 2025 venue.
— ICC (@ICC) December 19, 2024
Details 👇https://t.co/aWEFiF5qeS
हायब्रिड माँडेलमध्ये हे सामने
आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसह भारत यजमान असलेल्या महिला वर्ल्ड कप- 2025 स्पर्धेतील भारत-पाकिस्तानचे सामनेही त्रयस्त ठिकाणी होणार आहेत. त्यामुळे पाकिस्तान महिला क्रिकेट टीम भारतात येणार नाही, हे यामुळे स्पष्ट झाले. तसेच 2026 साली मेन्स टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपचं आयोजन संयुक्तरित्या भारत आणि श्रीलंकेत करण्यात आलं आहे. त्यामुळे पाकिस्तान आपले सामने श्रीलंकेत खेळणार आहे.
पाकिस्तानला गूड न्यूज
महिला आयसीसी टी- 20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आयसीसीने पाकिस्तानला दिला आहे. परंतु ही स्पर्धाही हायब्रिड मॉडेलनेच होणार आहे. त्यामुळे टीम इंडियाही तेव्हा आपले सामने त्रयस्थ ठिकाणी खेळेल, हे आत्ताच स्पष्ट झालं आहे. भारत-पाकिस्तान सामन्याच्या आयोजनाचा तिढा सुटल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या वेळापत्रकाचे वेध लागले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अवघ्या काही दिवसांमध्येच वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे.












Click it and Unblock the Notifications