बीसीसीआयचा मोठा निर्णय: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील खराब कामगिरीनंतर प्रशिक्षकासह तिघांना पदावरून हटवले
भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने (BCCI) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय संघात मोठे बदल केले आहेत. सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांना आपल्या पदावरून काढून टाकण्यात आले आहे. या निर्णयामागे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3-1 च्या मालिकेतील पराभव आणि ड्रेसिंग रूममधील माहिती लीक होण्याच्या घटना कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 3-1 अशी मालिका गमावली, ज्यामुळे संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी हुकली. या पराभवामुळे बीसीसीआयने त्वरित कारवाई करत प्रशिक्षक संघातील महत्त्वाच्या सदस्यांना हटवण्याचा निर्णय घेतला.

फोटो सौजन्य- पीटीआय
सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांची नियुक्ती फक्त आठ महिन्यांपूर्वी झाली होती.त्याचबरोबर, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांच्यावरही संघाची क्षेत्ररक्षणात झालेली कमकुवतता आणि ड्रेसिंग रूममधील माहिती लीक होण्याच्या घटना कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे. या घटनांमुळे संघातील विश्वार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते, ज्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. बीसीसीआयने या कारवाईमागे संघाच्या कामगिरीत सुधारणा आणि नवीन दिशा देण्याचा उद्देश असल्याचे सांगितले आहे.
अभिषेक नायर आणि टी दिलीप यांचे योगदान
अभिषेक नायर हे माजी क्रिकेटपटू असून त्यांनी आपल्या कोचिंग कारकिर्दीत कोलकाता नाइट रायडर्ससोबत यशस्वी कामगिरी केली होती. ऑगस्ट 2024 मध्ये त्यांची भारतीय संघातील सहाय्यक प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती, पण त्यांच्या छोट्या कालावधीतील कामगिरीवर प्रश्न उपस्थित झाले. रिपोर्टनुसार, नायर यांच्यावर संघातील फलंदाजीतील कमकुवतता आणि खेळाडूंशी संवादाच्या कमतरतेचा आरोप होता. दुसरीकडे टी दिलीप हे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून 2021 पासून भारतीय संघासोबत होते आणि त्यांनी 2023 च्या विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तरीही,ऑस्ट्रेलिया दौऱ्यात क्षेत्ररक्षणातील चूक आणि फलंदाजांना मार्गदर्शनात अपयश यामुळे त्यांच्यावर टीका झाली होती.
नवीन नियुक्त्या लवकरचं होणार
बीसीसीआयने नायर आणि दिलीप यांच्या जागी नवीन नियुक्त्या करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. रिपोर्टनुसार नवीन क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षक निवडण्यासाठी मुलाखती आणि मूल्यांकन प्रक्रिया लवकरच सुरू होईल. दरम्यान ट्रेनर प्रशिक्षक सोहम देसाई यांच्यालाही हटवण्यात आले असून, त्यांच्या जागी एड्रियन ले रू यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. ले रू हे आधी पंजाब किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्ससोबत काम केललं आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगिरी
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीतील पराभव हे या बदलांचे मुख्य कारण आहे. भारतीय संघाने पहिल्या कसोटीत विजय मिळवला होता, परंतु पुढील तीन सामन्यांत पराभव पत्करावा लागला. मेलबर्न कसोटीत 184 धावांनी आणि सिडनी कसोटीत 6 गडींनी पराभव झाला, ज्यामुळे संघाची क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीतील कमकुवतता उघड झाली. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली, ज्यामुळे प्रशिक्षकांवर दबाव वाढला. तसेच ड्रेसिंग रूममधील माहिती लीक होण्याच्या घटनेने बीसीसीआयची नाराजी वाढली, ज्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.












Click it and Unblock the Notifications