टीम इंडियावर BCCI कडून पैशांचा पाऊस! चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्याबद्दल एवढी मोठी रक्कम देणार बक्षीस
Bcci announced 58 crore reward : मानाची चॅम्पियन ट्राॅफी जिंकणाऱ्या भारतीय संघासाठी बीसीसीआयने आपली तिजोरी उघडली आणि टीम इंडियावर पैशांचा मोठा वर्षाव केला आहे. भारतीय संघाने पाकिस्तानला पराभूत करुन घरचा रस्ता दाखवला. याशिवाय चॅम्पियन स्पर्धा जिंकून विजेतेपद पटकावत देशवासीयांना आनंदाची संधी दिली.
आता टीम इंडियावर बीसीसीआयने कोट्यवधी रुपयांच्या बक्षीसाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली जिंकलेल्या संघावर सर्वजण खूपच खूश आहेत. बक्षीसाची माहिती वेबसाईटवर बीसीसीआयने दिली आहे. यामुळे टीम इंडियाचे मनोबल नक्कीच उंचावेल विशेष म्हणजे बक्षिसाची रक्कमही खूप मोठी आहे.

किती कोटींचे केले बक्षीस जाहीर?
टीम इंडियाला जेतेपदासाठी 58 कोटींचे बक्षीस देण्याची बीसीसीआयने घोषणा केली आहे. यात खेळाडूंव्यतिरिक्त कोचिंग स्टाफ, सपोर्ट कर्मचारी आणि निवड समिती सदस्यांचाही समावेश आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी संघाचा गौरव केल्याबद्दल अभिमान व्यक्त केला.बोर्ड सेक्रेटरी म्हणाले की, बीसीसीआयला खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना या योग्य पुरस्काराने सन्मानित करण्यात अभिमान वाटतो.
जागतिक क्रिकेटमध्ये त्यांचे वर्चस्व हे अनेक वर्षांच्या मेहनतीचे आणि धोरणात्मक अंमलबजावणीचे परिणाम आहे. या विजयाने पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये भारताच्या अव्वल रँकिंगचे समर्थन केले आहे आणि आम्हाला खात्री आहे की संघ पुढील वर्षांत उत्कृष्ट कामगिरी करत राहील.
कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने न्यूझीलंडचा शानदार पद्धतीने पराभव केला. भारतीय संघाने साखळी फेरीत बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडला पराभूत करून उपांत्य फेरी गाठली होती आणि तिथे ऑस्ट्रेलियाला पराभूत केले होते. न्यूझीलंड विरुद्ध अंतीम सामना खेळला गेला, या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडला पराभूत करून तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि करोडो देशवासीयांना उत्सव साजरा करण्याची संधी दिली.












Click it and Unblock the Notifications