Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विरोधकांवर हल्लाबोल करणारे योगी आदित्यानाथ यांचे हे 5 वक्तव्य! भावना गवळींसाठी पोहरादेवीत शंखनाद सभा

Yogi Adityanath's Meeting in Washim Pohradevi : "महाविकास आघाडी मुस्लिम धार्जिणी असून देशाचे तुकडे करू पाहत आहे." असा आरोप करत महाविकास आघाडीचे हे प्रयत्न हे यशस्वी होऊ देणार नाही असे वक्तव्य उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज वाशिम येथील पोहरादेवी येथे केले.

आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने वाशीम जिल्ह्यातील भाजप पुरस्कृत महायुतीच्या कारंजा लाड येथील उमेदवार सई डहाके, वाशीम विधानसभेचे उमेदवार श्याम खोडे आणि रिसोड विधानसभेच्या शिवसेनेच्या उमेदवार भावना गवळी यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या शंखनाद सभा वाशीम जिल्ह्यातील बंजारा काशी पोहरादेवी येथे पार पडली. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला.

Yogi Adityanath s Meeting in Washim Pohradevi

याप्रसंगी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पोहरादेवी येथील जगदंबा मातेचे दर्शन घेऊन संत सेवालाल महाराज व संत डॉ.रामराव महाराज यांच्या समाधीचेही दर्शन घेतले.

महंत सुनील महाराजांचा राठोड भाजपमध्ये प्रवेश

गत महिन्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा राजीनामा दिलेले पोहरादेवी येथील महंत सुनील महाराज राठोड यांच्या योगी यांच्या उपस्थितीमध्ये भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. महंत सुनील महाराज राठोड यांच्या भाजप प्रवेशाने कारंजा विधानसभा व बहुदा जिल्ह्यामध्ये महायुतीची ताकद वाढली असल्याच बोलले जात आहे.

मला भाजपमध्ये प्रवेश मिळाला ही आनंदाची गोष्ट

दरम्यान, पोहरादेवीचा ज्या गतीने विकास झाला त्याच गतीने वाशीम जिल्ह्याचा विकास होण्यासाठी मी भाजपा प्रवेश करीत आहेत सेच देशाचे हिंदू धर्म रक्षीते थोर महंत म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा एका महंताच्याहस्ते मला भारतीय जनता पक्षात प्रवेश मिळाला ही माझ्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे अशी प्रतिक्रिया महंत सुनील महाराज राठोड यांनी दिली.

योगी आदित्यनाथ यांच्या भाषणातील हे पाच वक्तव्य

  • राजकीयदृष्ट्या अस्तित्वहीन झालेल्या बंजारा समाजाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले. गरीब बंजारा समाजाचं धर्मांतर करु पाहणाऱ्या प्रवृत्ती आता डोके वर काढणार नाहीत.

  • महाविकास आघाडी मुस्लिम धार्जिणे असून देशाचे तुकडे करू पाहत आहे, मात्र आम्ही हे यशस्वी होऊ देणार नाही. महाविकास आघाडी ही दिशाहीन आणि चालकहीन गाडी आह, ड्रायव्हर सिटवर कोण बसणार यासाठी आघाडीमध्ये संघर्ष.

  • काँग्रेसने देश धोक्यात घालून पाकिस्तानशी हितसंबध जोपासले. हा नवीन भारत असून अगोदर कुणाच्या वाकड्यात जात नाही आणि कुणी जर वाकड्यात गेल्यास घरात घुसून मारणारा भारत आहे.

  • 500 वर्षानंतर अयोध्येत भव्य राम मंदीर उभारले. हे कार्य कॉंग्रेसही करू शकली असतीमात्र कॉंग्रेसला हिंदुच्या भावनांची कदर नाही आमच्या महापुरुष व समाजसुधारकांना सामाजिक न्यायासाठी, संधीसाठी संघर्ष करावा लागला. राष्ट्रहीत जोपासण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मतदानरुपी आशीर्वाद मागायला मी आज बंजारा काशीत आलो.

  • एकत्र राहाल तर सेफ राहाल, बटेंगे तो कटेंगे असा पुन्हा योगींनी नारा दिला.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+