राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंसोबत काँग्रेस राहील का?, संजय राऊतांनी केला मोठा खुलासा, शिंदे गटाचा टोला!

Raj Thackeray-Uddhav Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (UBT) प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर, सर्वात मोठा प्रश्न म्हणजे काँग्रेसची पुढील भूमिका काय असेल? याबाबत, शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सोमवारी खुलासा केला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

संजय राऊत म्हणाले की, काँग्रेस मराठीपासून दूर जाईल का? काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) देखील मराठी मुद्द्यावर आमच्यासोबतच आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या मंचापासून काँग्रेस दूर का राहिले, याबाबत देखील राऊत म्हणाले की, कार्यक्रमाला जाऊ नये म्हणून दिल्लीतून काँग्रेसला कोणताही आदेश देण्यात आलेला नाही. या मुद्द्यावर आमची काँग्रेसशी चर्चा झाली. त्यांच्या काही महत्त्वाच्या बैठका झाल्या, त्यामुळे काँग्रेस नेते त्या दिवशी मंचावर उपस्थित राहू शकले नाहीत."

Raj Thackeray and Uddhav Thackeray

प्रश्न का उपस्थित झाले?

शनिवारी (5 जुलै) दोन्ही भाऊ 20 वर्षांनंतर एकाच मंचावर दिसले. यावेळी शरद पवार यांच्या पक्ष राष्ट्रवादीकडून लोकसभा खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड यांची उपस्थिती होती. परंतु काँग्रेसकडून कोणीही आले नाही. तेव्हापासून यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहेत.

खरं तर, शिवसेना (यूबीटी), राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेस यांची महाविकास आघाडी (MVA) मध्ये समाविष्ट आहेत. तिन्ही पक्षांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवल्या आहेत. मात्र, आता राज ठाकरे आणि शिवसेना (UBT) युती करणार आहेत, अशा परिस्थितीत महाविकास आघाडीचे भविष्य काय असणार, असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचा ठाकरें बंधूंवर निशाणा!

राज ठाकरे आणि काँग्रेसमध्ये दीर्घकाळापासून वाद आहे. शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी रविवारी (6 जुलै) एमव्हीएच्या भविष्याबाबत जोरदार निशाणा साधला. माजी काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणाले की, एमव्हीए ते टीव्हीए! काँग्रेसला वगळून काल एक नवीन राजकीय युती तयार झाली आहे. पूर्वी ती एमव्हीए म्हणजेच महाविकास आघाडी होती. त्याचे नवीन नाव टीव्हीए - ठाकरे विकास आघाडी अशी आता नवीन आघाडी सुरू झाली आहे.

राज ठाकरे यांच्या विधानाने पुन्हा संभ्रम!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) नेत्यांना राज ठाकरे यांनी दिलेल्या आदेशामुळे राज्यातील राजकीय तणाव वाढला आहे. भाऊ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना युबीटीशी संभाव्य युतीच्या चर्चेदरम्यान, राज ठाकरे यांनी त्यांच्या नेत्यांना या मुद्द्यावर कोणतेही विधान करू नका असे सांगितले. राज ठाकरे यांनी त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांना युतीबद्दल काहीही बोलण्यापूर्वी त्यांची परवानगी घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. परवानगीशिवाय काहीही चर्चा करू नका.

ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत गोंधळ

राज ठाकरे यांच्या आदेशामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (यूबीटी) आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. अलिकडेच वरळी येथील एनएससीआय डोम येथे आयोजित संयुक्त मराठी जल्लोष मेळावा कार्यक्रमात ठाकरे बंधू एकाच मंचावर एकत्र दिसले. यानंतर दोन्ही पक्षांमधील युतीच्या चर्चांना वेग आला, परंतु आता राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना दिलेल्या या स्पष्ट सूचनांमुळे या अटकळींबद्दल एक नवीन शंका निर्माण झालेली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+