Who is Vishwas Patil : सातारा येथील 99 साहित्य समेंलनाध्यक्षपदी निवड झालेले विश्वास पाटील कोण आहेत?
Who is Vishwas Patil Elected President of 99th Marathi Sahitya Sammelan : ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांची एकमताने निवड करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने दिली आहे. महामंडळाची आज पुण्यात पार पडलेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, सध्या याबाबतची अधिकृत पत्रकार परिषद सुरू आहे.
संमेलनाचे स्थळ आणि स्वागताध्यक्ष
यंदाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ऐतिहासिक शहर साताऱ्यात होणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले भूषवणार आहेत. साहित्य आणि राजकारण यांच्या या अनोख्या संगमामुळे हे संमेलन विशेष लक्षवेधी ठरणार आहे.

विश्वास पाटील कोण आहेत?
प्रसिद्ध साहित्यिक आणि प्रशासकीय अधिकारी विश्वास पाटील यांचा जन्म २८ नोव्हेंबर १९५९ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील नेर्ले येथे झाला. मराठी साहित्य विश्वात त्यांनी आपल्या प्रभावी लेखणीने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एम.ए. (इंग्रजी साहित्य) आणि कायद्याची पदवी त्यांनी घेतली. त्यांनी महत्त्वाची प्रशासकीय पदे भूषवली. विशेष म्हणजे त्यांच्या साहित्यकृतीला भारतीय साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे.
प्रमुख साहित्य
विश्वास पाटील यांच्या अनेक साहित्यकृतींनी मराठी साहित्यात मैलाचा दगड ठरल्या आहेत. त्यांच्या काही प्रमुख आणि गाजलेल्या रचना खालीलप्रमाणे आहेत.
झाडाझडती: धरणांमुळे विस्थापित झालेल्या लोकांच्या वेदनादायी कथांवर आधारित ही कादंबरी त्यांच्या सर्वोत्कृष्ट कामांपैकी एक मानली जाते. या कादंबरीला १९९२ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पानिपत: पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर आधारित ही एक ऐतिहासिक कादंबरी आहे, जी प्रचंड लोकप्रिय झाली.
महानायक: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित ही एक चरित्रात्मक कादंबरी आहे.
चंद्रमुखी: राजकारणी आणि "तमाशा" नृत्यांगना यांच्या नात्यावर आधारित ही कादंबरी नंतर चित्रपट स्वरूपातही खूप गाजली.
संभाजी: छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चरित्रात्मक कादंबरी.
पांगिरा: गावातील लोकांच्या संघर्षाची कथा मांडणारी कादंबरी.
लालबागची लालसा: मुंबईतील ग्रेट बॉम्बे टेक्सटाईल स्ट्राइकवर आधारित कादंबरी.
रणांगण: विश्वास पाटील यांच्यात 'पानिपत' कादंबरीवर आधारित नाटक.
वाऱ्यावर नाही गेली: चित्रपटसृष्टीतील व्यक्तींवर आधारित कादंबरी.
विश्वास पाटील यांना प्राप्त प्रमुख पुरस्कार
- साहित्य अकादमी पुरस्कार (१९९२): 'झाडाझडती' या कादंबरीसाठी.
- नाथ माधव पुरस्कार (१९८९): 'पानिपत'साठी.
- प्रियदर्शिनी राष्ट्रीय पुरस्कार (१९९०): 'झाडाझडती'साठी.
- भारतीय भाषा परिषद पुरस्कार (१९९०): 'पानिपत'साठी.
- विखे पाटील पुरस्कार (१९९०): 'झाडाझडती'साठी.
- गडकरी पुरस्कार (१९९८): 'महानायक'साठी.












Click it and Unblock the Notifications