Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण ? शरद पवारांनी एका मिनिटात विषय संपवला

शिवसेनेचे प्रवक्ते संजय राउत यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव दामटलय. ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा, अन्यथा निवडणूक लढणे कठीण जाईल, अशी घोषणाच संजय राउत यांनी करून टाकली होती.

Sharad Pawar

त्यामुळे महाविकास आघाडीत एका नव्या चर्चेला उधाण आलं होतं. त्यावर शरद पवार यांनी एक सुचक विधान केलं आहे. "सामुहिक नेतृत्व हे आमचं सूत्र आहे, असं उत्तर शरद पवारांनी दिलं आहे. आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा आहे. इथे कोणतीही व्यक्ती देण्याचा प्रश्न नाही", असं शरद पवार म्हणाले आहेत. शरद पवार हे कोल्हापूर दौ-यावर असतांना माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.

दोन दिवसापुर्वीच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय राउत यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांचं नाव दामटलय होतं. ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करा, अन्यथा निवडणूक लढणे कठीण जाईल, अशी घोषणाच संजय राउत यांनी करून टाकली होती. त्यामुळे महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली होती.

काय म्हणाले होते संजय राऊत?

संजय राऊतांनी शुक्रवारी आणि सकाळी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याविषयी भाष्य केलं होतं. "महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याशिवाय निवडणुकांना सामोरं जाणं हा धोका आहे. महाराष्ट्रानं उद्धव ठाकरेंचं काम पाहिलं आहे. लोकसभेतलं मतदान उद्धव ठाकरेंकडे पाहूनही झालं आहे. अर्थात, तिघांची ताकद एकत्र होती. पण बिनचेहऱ्याची आघाडी ही अजिबात चालणार नाही", असं संजय राऊत म्हणाले होते.

मित्र पक्षांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न राहिलं

"आमची अजून काही निवडणुकीवर चर्चा झालेली नाही. आम्ही असं ठरवलंय की आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील पक्ष असे आम्ही तिघे मिळून निर्णय घेणार आहोत. माझी त्या बैठकीत अशी सूचना असेल की लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्ष, डावे कम्युनिस्ट, उजवे कम्युनिस्ट, आप या लोकांनी आम्हाला मदत केली. जरी आघाडीत सध्या आम्ही तिघंच असणार असलो, तरी डाव्या विचारसरणीचे जे घटक आहेत आणि जे मोदींच्या विरोधात आहेत त्यांनाही सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. आमची चर्चा झाल्यानंतर जागांचं वाटप झालं की सगळे पक्ष त्यांच्या सहकाऱ्यांना-संघटनेला विश्वासात घेऊन निर्णय घेतील", असं मोठं विधान शरद पवार यांनी केलं आहे.

अजित पवार गटाचे आमदार परत येणार?

पत्रकारांनी अजित पवार गटाचे आमदार परत आल्यास तुमची काय भूमिका असेल असा प्रश्न केला? त्यावर शरद पवारांनी सूचक विधान केलं. "त्याविषयी जयंत पाटील आणि इतर लोकांना माहिती असेल ते. माझी काही कुणाशी प्रत्यक्ष भेट झालेली नाही. कोण येतं ते बघूयात. प्रस्ताव तरी येऊ द्या. किमान माझ्याकडे तरी प्रस्ताव आलेला नाही", असं पवार म्हणाले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+