Who is Acharya Devvrat : कोण आहेत आचार्य देवव्रत? महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून उद्या घेणार शपथ
Who is Acharya Devvrat : उपराष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यामुळे महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाचा सी. पी. राधाकृष्णन यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे हे संवैधानिक पदी आता गुजरातचे विद्यमान राज्यपाल आचार्य देवव्रत यांना नियुक्त केले आहे. त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आले आहे.
राज्यपाल आचार्य देवव्रत आज सकाळी (१४ सप्टेंबर) अहमदाबादहून तेजस एक्सप्रेसने मुंबईला रवाना झाले. राज्यपालांच्या पत्नी दर्शना देवी देखील उपस्थित होत्या. विशेष म्हणजे राज्यपाल आचार्य देवव्रत हे शपथविधीसाठी मुंबईत येत आहेत, १५ सप्टेंबर रोजी सोमवार, सकाळी ११ वाजता राजभवन, मुंबई येथील दरबार हॉलमध्ये महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेणार आहेत.

आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे राज्यपाल असतील त्यामुळे ते नेमके कोण आहेत, त्यांच्याबद्दल जाणून घेण्यास लोक उत्सुक आहेत. शेतकरी ते राजकारणी आणि राज्यपाल असलेले आचार्य देवव्रत यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया.
कोण आहेत आचार्य देवव्रत?
माहितीनुसार, आचार्य देवव्रतहे गुजरातचे २० वे राज्यपाल आहेत. त्यापुर्वी ते हिमाचल प्रदेशचे १८ वे राज्यपाल होते.
आचार्य देवव्रत यांचा जन्म आचार्य देवव्रत जन्म १८ जानेवारी १९५९ रोजी समालखा, तत्कालीन पूर्व पंजाब (आता हरियाणा) येथे झाला आहे. त्यांचे लग्न दर्शना देवी यांच्याशी झाले आहे. जुलै २०१९ पासून गुजरातचे राज्यपाल आहेत.
आचार्य देवव्रत यांनी यापुर्वी हरियाणातील कुरुक्षेत्र येथील गुरुकुलाचे प्राचार्य म्हणूनही काम केले आहे. गुजरातचे राज्यपाल असल्याने ते गुजरातच्या राज्य विद्यापीठांचे कुलपतीही आहेत.
आचार्य देवव्रत आर्य समाजाचे एक प्रमुख प्रचारक आहेत. तसेच ते प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आहेत.
प्रमुख पदे आणि योगदान
गुजरातचे राज्यपाल: जून २०१९ मध्ये, ओम प्रकाश कोहली यांच्या जागी त्यांची गुजरातच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली. या भूमिकेत ते गुजरातच्या सर्व राज्य विद्यापीठांचे कुलपती म्हणूनही काम पाहतात.
नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते
विकिपीडियानुसार, आचार्य देवव्रत हे आर्य समाजी आहेत आणि नैसर्गिक शेतीचे मोठे पुरस्कर्ते आहेत. त्यांनी १८० एकर जमिनीवर नैसर्गिक शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे.
नैसर्गिक शेतीबद्दल त्यांचे विचार काय आहेत?
गुजरात येथील नर्मदा येथे आयोजित एका नैसर्गिक शेती शिबिरात त्यांनी आपल्या विचारांची मांडणी केली. "देव प्रसन्न व्हावा म्हणून लोक मंदिरात, मशिदीत, गुरुद्वारा आणि चर्चमध्ये जातात. पण माझं सांगणं आहे की, तुम्ही नैसर्गिक शेती करायला लागलात, तर देव आपोआपच प्रसन्न होईल."
त्यांच्या मते, सध्याची रासायनिक शेती (Chemical Farming) प्राण्यांना मारण्याचं काम करत आहे, तर नैसर्गिक शेती जीवदान देते. त्यांनी मानवी स्वभावावरही भाष्य करताना म्हटले की, "मनुष्य हा असा प्राणी आहे, त्याच्यासारखा ढोंगी, कृत्रिम आणि दांभिक दुसरा कोणी नाही."












Click it and Unblock the Notifications