Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

badlapur rape case: आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न झाला, घटनेला महाविनाशी सरकार जबाबदार- विजय वडेट्टीवार

Badlapur School Girl Rape Case MVA Vs Mahayuti :बदलापूर अत्याचाराच्या प्रकरणानंतर महाराष्ट्रात संताप व्यक्त होत असून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न का झाला? हाॅस्पिटलमध्येही हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न झाला असा आरोप करत महाराष्ट्रात घडलेल्या या घटनेला महाविनाशी सरकार जबाबदार असल्याची टीका विधीमंडळाचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

बदलापूर येथे घडलेल्या घटनेनंतर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांवर आरोप केले. त्याचे खंडन करत वडेट्टीवार यांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला. ते आज माध्यमांशी बोलत होते.

Badlapur School Girl Rape Case MVA Vs Mahayuti Maharashtra Politics

आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न का झाला?

विजय वडेट्टीवार यांनी सवाल केला की, आरोपीला का वाचवण्याचा प्रयत्न झाला कोण लागून गेला तो..राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे म्हणून त्याला वाचवण्याचा प्रयत्न आहे का..त्या संस्थेतील कर्मचारी म्हणून वाचवत होतात का..मला त्या मुलीच्या वेदना शब्दात व्यक्त करता येत नाही. ती मुलगी विव्हळत होती.

हाॅस्पिटलमध्ये हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न

विजय वडेट्टीवार म्हणाले, हाॅस्पिटलमध्येही हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न झाला. लहान बालिकेवर साडेतीन वर्षाच्या या मुलीवर अत्याचार होतो, तुमच्या संवेदना आहेत की, नाही एवढं संवेदनशुन्य सरकार महाराष्ट्रात कधीच नव्हते.

महाराष्ट्राची इभ्रत महाविनाशी सरकारमुळे गेली

विजय वडेट्टीवार म्हणाले, या प्रकरणात विरोधकांचा हात आहे असा आरोप केला जातो पण तीनशे लोकांत शोधा कोण विरोधक होते, कोणत्या विरोधकांच्या चिथावणीमुळे झाले. तुमचे आमदार आणि तुमचे नगराध्यक्ष महिला पत्रकाराला धमकावतात. वामन म्हात्रे यांची कुठली भाषा. असा सवालही त्यांनी केला.

विजय वडेट्टीवार म्हणाले, जे चिथावणी देत आहेत, त्यांना संरक्षण दिले जाते. काल जो लाठीचार्ज झाला ते आमदार बालाजी केणेकर तेथून सांगतात की, लाठीचार्ज करा म्हणून..लोकांवर लाठीचार्ज करता ही महाराष्ट्राची इभ्रत घालवणारी घटना आहे. महाराष्ट्रात घडलेल्या घटनेला महाविनाशी सरकार जबाबदार आहे.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

विजय वडेट्टीवार म्हणाले, या पापाचे प्रायश्चित घेऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यायला हवा. या प्रकरणाची दखल घेण्यास एवढा उशीर का झाला. लोकांना का वाट पाहावी लागली, लोकांचा उद्रेक होईपर्यंत तुम्ही का थांबलात असे सवालही वडेट्टीवार यांनी केले आहेत.

या राज्यात सरकार, पोलिस कुठे आहेत?

विजय वडेट्टीवार म्हणाले,एकतर वरील प्रश्नांची सरकार उत्तरं देत नाही उलट विरोधीपक्षाला सत्ताधारी लक्ष्य करत आहेत. पोलिसांचा राज्यात धाक राहीला नाही. सरकार, यत्रणा कुठे आहे महाराष्ट्रात...असा सवाल करत टक्केवारी आणि कमीशनखोरी राज्यात सरकारमार्फ सुरु असल्याचा आरोप त्यांनी केला.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+