शाळेचे व्यवस्थापन अदानींना, वडेट्टीवार संतापले; शाळांमध्ये आता संघाचे विचार शिकवायचे आहेत का?
Vijay Vadettiwar on Shinde Fadnavis Sarkar Adani Issue : चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस येथील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट शाळेचे व्यवस्थापन अदानी फाऊंडेशनकडे सोपविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विरोधक आक्रमक झाले आहेत.
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी आता शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. आता महाराष्ट्राचा 7/12 च अदानींच्या नावे करणार का, महापुरुषांच्या प्रतीमासोबत आता अदानींचाही फोटो लावायचा शिंदे फडणवीसांचा डाव आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार?
विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावर शासन निर्णयाची प्रत शेअर करत सरकारला जाब विचारला आहे. महाराष्ट्राला महायुती सरकार एवढाच धोका अदानीचा देखील आहे. एअरपोर्ट, वीज, धारावी, मुंबईतील जमिनी झाल्या आता शाळांवर पण अदानींचा डोळा आहे. महायुती सरकारने संपूर्ण महाराष्ट्राचा 7/12 च अदानी अँड कंपनीला द्यायचा ठरवले आहे का? असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी या पोस्टमध्ये केला आहे. शाळांमध्ये गौतम अदानीचा फोटो लावण्याची तयारी सुरू केली का, असा खडेबोल देखील त्यांनी सुनावले.
अब महाराष्ट्र के सरकारी स्कूलों में अदानी का फोटो लगाने की तैयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व वाली महायुती सरकार ने कर ली हैं । pic.twitter.com/3WNzRjyI9G
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 29, 2024
शाळेच्या भिंतीवर आदराने आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी लावलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमांसोबत आता गौतम अदानी यांचा पण फोटो लावायची तयारी शिंदे, फडणवीस आणि अजित पवार सरकारकडून सुरू झाली आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
महाराष्ट्राची अस्मिता गुजरातकडे गहाण
विजय वडेट्टीवार म्हणाले की, महाराष्ट्रातील विमानतळे अदानीला देण्यात येत आहेत. राज्यातील बंदरे अदानीला दिली जात आहेत. कोट्यवधी रुपयांची प्राइम जमीन आणि रेल्वे दिली जात आहे, केवळ शाळा बाकी होत्या, आता त्या देखील अदानीला दिल्या जात आहेत. शिक्षणाचे खासगीकरण करून आता शाळांमध्ये संघाचे विचार शिकवले जाणार, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
महाराष्ट्राचा ७/१२ अदानीच्या नावे लिहिणार का महायुती सरकार?
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 29, 2024
महाराष्ट्राला महायुती सरकार एवढाच धोका अदानीचा देखील आहे. एअरपोर्ट, वीज, धारावी, मुंबईतील जमिनी झाल्या आता शाळांवर पण अदानींचा डोळा आहे.
महायुती सरकारने संपूर्ण महाराष्ट्राचा ७/१२ च अदानी अँड कंपनीला द्यायचा ठरवलं आहे… pic.twitter.com/r3CPqsJwK1
महाराष्ट्राचा 7/12 अदानीच्या नावे करावा अशी सरकारची मंशा आहे. असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. आता महायुती सरकार महाराष्ट्राच्या अस्मितेला गुजरातकडे गहाण ठेवण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेसोबत खेळणाऱ्यांना सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवायची गरज आहे, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.












Click it and Unblock the Notifications