वाल्मिक कराडची तब्बेत बिघडली, जामीन अर्जही मागे घेतला; अचानक घडलेल्या घटनांनी चर्चा वाढली
वाल्मिक कराडने खंडणी प्रकरणात न्याायलयात सादर केलेला जामीन अर्ज आज मागे घेतला. जामीन सुनावणीच्या अर्जावर दोन तारखा झाल्यानंतर आता अचानक हा जामीन अर्ज का मागे घेतला, याबाबच मात्र चर्चा रंगल्या आहेत. विशेष म्हणजे वाल्मिकच्या वकीलांना हा अर्ज मागे घेताना कुठलंही कारण सांगितलं नाही.

नेमकं काय झालं?
खंडणीच्या गुन्ह्यात जामीन मिळावा, असा अर्ज वाल्मिक कराडचे वकील अशोक कवडे यांनी न्यायालयात टाकला होता. मात्र दोन तारखा झाल्यानंतर आता वाल्मिक कराडला जामीन मिळतो की एमसीआर मिळतो, या चर्चा होत्या. मात्र आज अचानक वाल्मिक कराडच्या वकीलांना हा जामीन अर्जच मागे घेतला. दोन तारखा झाल्यानंतर अचानक अर्ज का मागे घेतला, हे कारण मात्र गुलदस्त्यात आहे. या प्रकारामुळे मात्र आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
वाल्मिक रुग्णालयात
वाल्मिक कराडच्या पोटात दुखत असल्यनाने त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयाकडून उपचार सुरु आहेत. रुग्णालयाचे प्रभारी शल्यचित्सक एस. बी. राऊत यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, पोलिसांनी आम्हाला कळविल्यावर कारागृहात जाऊुन वाल्मिक कराड याची तपासणी करण्यात आली. त्यानुसार काही तपासण्या आवश्यक होत्या. त्यासाठी बीड जिल्हा रुग्णालयात रात्री १२.३० वाजता दाखल करणं आवश्यक होतं. त्यानुसार वाल्मिक कराडवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सोनोग्राफी, रक्त चाचणी, यूरिन टेस्ट केली जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, असं डाँ. राऊत म्हणाले.
त्या अलिशान गाड्यांची चर्चा
कराड आणि इतर आरोपी सीआयडीला शरण जाण्यापूर्वी बीडवरून पुण्याला गेले होते का..? असा सवाल सध्या उपस्थित केला जात आहे. 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावर तीन आलिशान गाड्यांमधून आरोपी पुण्याला गेल्याची चर्चा आहे. बीडच्या मांजरसुंबा येथील एका हॉटेलवर त्यांनी जेवण केले, तसेच एका पेट्रोल पंपावर गाडीत डिझेल भरले. याच गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोल नाका येथे रात्री 1.36 वाजता पास झाल्या. या गाड्यांमध्ये बसून आरोपी गेले अशी चर्चा आहे.












Click it and Unblock the Notifications