ठाकरेंकडून तातडीची बैठक, काँग्रेससोबत बिनसलं, स्वबळावर लढण्याची तयारी?, पवार मध्यस्थी करणार का?
Urgent meeting on Uddhav Thackeray's residence Matoshree : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग पाहायला मिळत आहे. महायुती असो की महाविकास आघाडी यांच्यात जागावाटपासंदर्भात महत्त्वाच्या बैठकांना जोर आलेला आहे. अशातच उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाची तातडीची बैठक पार पडत आहे. यात सर्व आमदारांना व राज्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आलेले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत सुरू असलेल्या तणाव स्थिती त्यावर ठाकरे आपल्या शिलेदारांना नेमक्या काय सूचना देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागा वाटपाचा तिढा सोडवला जात आहे. अशातच उद्धव ठाकरेंनी बोलावली मातोश्रीवर नेत्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. उद्धव ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. राज्यातील 288 जागांवर वेळप्रसंगी लढण्याची गरज पडल्यास त्या अनुषंगाने तयारी सुरू झालेली आहे. त्याच अनुषंगाने आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे.

काँग्रेस-ठाकरे गटात बिनसल्याची चर्चा
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात काहीसं बिनसलं होतं. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे नाना पटोले नाराज झाले होते. पण, त्यानंतर मतभेद दूर झाल्याचंही महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सांगण्यात आलं होतं. अशातच आता ठाकरेंनी बोलवलेल्या तातडीच्या बैठकीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीवर दबावाची खेळी तर नाही ना? की खरंच वेगळा मार्ग निवडण्याचा ठाकरेंचा विचार आहे, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.
हे ही वाचा : उद्धव ठाकरे 'या' आमदारांना डच्चू देणार? पहा नेमका कुणाचा पत्ता होणार कट
जागेंवरुन दोन गटात धुसफूस?
मविआच्या फॉर्म्युल्यानुसार, ठाकरे गटाला विदर्भात 8 जागा मिळाल्या आहेत. मात्र, ठाकरे गट 12 जागांसाठी आग्रही आहे. विदर्भातल्या जागांवरुनच ठाकरे गट महाविकास आघाडीत नाराज असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. महाविकास आघाडीमधील धुसफुस कायम असून विदर्भातील जागांवर अजूनही रस्सीखेच सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
विदर्भातील जागांवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस अजूनही आडून आहे. शिवसेना आणि काँग्रेसचे जागावाटपात काही जमेना, अकंदरीत अशीच परिस्थिती आहे. शनिवारी 10 तास बैठक होऊनही अद्याप जागावाटपावर तोडगा निघालेला नाही. अशातच आज उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावली आहे. बैठकीत ज्या जागांवर तिढा आहे, त्या जागांवर पक्षांतर्गत चर्चा केली जाणार आहे.
हे ही वाचा : माहिमधून अमित, तर वरळीतून आदित्य ठाकरे लढणार; पण एकमेकांविरोधात उमेदवार देणार नाहीत..?
आदित्य ठाकरे शरद पवारांच्या भेटीला
आदित्य ठाकरे शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले होते. मुंबईतील वाय. बी. चव्हाण सेंटरला जात आदित्य ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. जाहीरनाम्यातील काही मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांना भेटायला आलो, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. मात्र काँग्रेस- शिवसेना वादाच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी ही भेट घेतल्यांचं समजतं आहे.
काही वेगळे निर्णय घ्यावे लागतात- संजय राऊत
उद्धव ठाकरे यांनी आमदारांची मातोश्रीवर तातडीची बैठक बोलावल्याची माहिती स्वतः संजय राऊत यांनी दिली. तसेच, काही वेगळे निर्णय घ्यावे लागतात, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं होतं. महाविकास आघाडीचं जागावाटप निश्चित झालं असलं तरी विदर्भातल्या काही जागांवरुन काँग्रेस-ठाकरे गटात मतभेद निर्माण झाल्याची माहिती मिळत आहे. मविआच्या फॉर्म्युल्यानुसार, ठाकरे गटाला विदर्भात 8 जागा मिळाल्या आहेत. मात्र, ठाकरे गट 12 जागांसाठी आग्रही आहे. विदर्भातल्या जागांवरुनच ठाकरे गट महाविकास आघाडीत नाराज असल्याचे दिसून येत आहे.












Click it and Unblock the Notifications