उद्धव ठाकरे 'या' आमदारांना डच्चू देणार? पहा नेमका कुणाचा पत्ता होणार कट

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या विधानसभेची तयारी करत आहेत. रुग्णालयातून बाहेर आल्याबरोबर गुरुवारी त्यांनी मातोश्रीवर ठाकरे गटाच्या आमदारांची बैठक घेतती. या बैठकीला ठाकरे गटाचे महाराष्ट्रातील आमदार उपस्थित होते. मात्र विधानसभेतील पक्षाचे गटनेते अजय चौधरी आणि चेंबूरचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांना बोलावण्यात आलेले नव्हते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत या दोघांचा पत्ता कट होणार का? अशा चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे हे यंदा भाकरी फिरवणार व अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देणार, असेही आता बोलले जाऊ लागले आहे. महाराष्ट्रभर या विषयाची चर्चा झाल्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

शिवसेनेच्या मुंबईतल्या विद्यमान आमदारांना डच्चू मिळेल अशी चर्चा सुरु झाल्याबद्दल पत्रकारांनी संजय राऊत यांना याबाबत विचारले. त्यावर राऊत म्हणाले की, मला असं वाटत नाही. उद्धव ठाकरे हे कालपासून कामाला लागलेले आहेत. अजय चौधरी आणि प्रकाश फातर्पेकर यांना बैठकीच्या आमंत्रण नव्हते. याबाबत विचारले असता ते म्हणाले की, एकाच दिवशी सगळ्यांना आमंत्रण दिले जात नाही. अजय चौधरी हे पक्षाचे ज्येष्ठ आमदार आहेत. ते शिवसेनेचे विधानसभेचे गटनेते आहेत. त्यांच्या विषयाच्या अशा अफवा कोणी पसरत असेल तर ते चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

Uddhav Thackeray

चेंबूरमधून पाटणकरांना उमेदवारी?

या बैठकीला चौधरी आणि फातर्पेकर यांना निमंत्रण देण्यात आले नाही. त्यामुळे हे दोन आमदार अस्वस्थ असल्याची माहिती मिळत आहे. या दोन मतदारसंघात इतरही अनेक दावेदार असल्यामुळे या मतदारसंघात तिढा आहे. हा तिढा आता खुद्द उद्धव ठाकरे सोडवणार असल्याची माहिती मिळत आहे. चेंबूरमध्ये विद्यमान आमदार प्रकाश फातर्पेकर असले तरी माजी नगरसेवक अनिल पाटणकर हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. त्यामुळेच फातर्पेकर यांच्याऐवजी पाटणकर यांना उमेदवारी मिळेल, अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.

शिवडीतून सुधीर साळवींची दावेदारी

शिवडी मतदारसंघातील विद्यमान आमदार अजय चौधरी हे आतापर्यंत दोनदा निवडून आले आहेत. उद्धव ठाकरे यांनी चौधरी यांना विधानसभेच्या गटनेतेपदी नेमले होते. मात्र गटनेते पदावरून चौधरी यांची आक्रमकता दिसली नाही. त्यातच लोकसभा निवडणुकीत शिवडीमध्ये मताधिक्य घटल्यामुळे चौधरी पुन्हा ठाकरे गटाच्या निशाण्यावर आले आहेत. अजय चौधरी विद्यमान आमदार असले तरी, सुधीर साळवी हे यंदा शिवडीतून उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+