उजनी धरण 45 वर्षांत पहिल्यांदाच मेमध्ये प्लसमध्ये, तुमच्या जिल्ह्यातील धरणांची स्थिती काय?
महाराष्ट्रात यंदा मान्सूनपूर्व पावसाने रेकॉर्ड मोडले असून, राज्यातील प्रमुख धरणांमध्ये अभूतपूर्व जलसाठा झाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, उजनी धरण - जे सोलापूर, पुणे, धाराशिव आणि नगर जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो - ते 45 वर्षांत पहिल्यांदाच मे महिन्यात प्लसमध्ये आले आहे.

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणात जोरदार पावसामुळे राज्यभरातील जलाशय भरण्याचा वेग वाढला आहे. दोनच दिवसांत झालेल्या जोरदार पावसामुळे उजनीसह अनेक धरणांमध्ये जलपातळी लक्षणीय वाढली आहे.
राज्यव्यापी जलसाठ्यात वाढ, धरण विभागनिहाय स्थिती
जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, आजघडीला राज्यभरातील धरणांमध्ये 28.45 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही स्थिती अधिक सकारात्मक आहे.
नाशिक विभागात: 30% जलसाठा शिल्लक आहे.
पुणे विभाग: 21.76%
मराठवाडा: 28.37% (गेल्या वर्षी फक्त 11.8%)
कोकण: सर्वाधिक 35.75% जलसाठा
विदर्भातील नागपूर: 33.52%
अमरावती विभाग: 39.70%
मराठवाड्यातील जायकवाडी आणि इतर प्रमुख धरणांची स्थिती
मराठवाड्याच्या दृष्टीने महत्वाचं मानलं जाणारं जायकवाडी धरण सध्या 29.65% जलसाठ्यापर्यंत भरले आहे, जे गेल्या वर्षी याच वेळी केवळ 5.15% होतं. बीड जिल्ह्यातील मांजरा धरण 20% वर पोहोचले असून, मागील वर्षी ते संपूर्ण कोरडे होते. याच जिल्ह्यातील माजलगाव धरणदेखील आता 3.89% नी भरले आहे.
सिद्धेश्वर (हिंगोली): 18.82%
येलदरी: 49.71%
विष्णुपुरी (नांदेड): 19.59%
निम्न तीरण (धाराशिव): 54.33%
निम्न दुधना (परभणी): 32.19% (मागील वर्षी येथे जलसाठा शून्यावर होता)
नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांची जलपातळी
भंडारदरा (नगर): 25.43%
मुळा: 18.66%
निळवंडे: 25.15%
दारणा (नाशिक): 35.71%
गंगापूर: 44.42%
गिरणा: 21.91%
वितरण: 38.2%
पुणे, कोल्हापूर, सांगली व साताऱ्याची स्थिती
खडकवासला (पुणे): 46.13%
पानशेत: 17.97%
पवना: 26.23%
भाटघर: फक्त 0.48%
दूधगंगा (कोल्हापूर): 13.79%
राधानगरी: 43.75%
वारणा (सांगली): 24.89%
कोयना (सातारा): 19.8%
मान्सूनपूर्व पावसामुळे जलसंपदेला दिलासा
पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा जास्त असल्यामुळे यंदा पाणीसाठ्याच्या दृष्टीने राज्याला दिलासा मिळाला आहे. उजनीसारख्या धरणांमध्ये मे महिन्यातच जलसाठा सकारात्मक पातळीवर जाणे ही मोठी बाब मानली जात आहे. आगामी काही दिवसांत मान्सून अधिक सक्रिय झाल्यास, जूनच्या सुरुवातीलाच अनेक धरणे भरतील, असा अंदाज जलतज्ज्ञांनी वर्तवला आहे.












Click it and Unblock the Notifications