मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरेंचे एक पाऊल मागे म्हणाले- MVA ज्याला ठरवेल, त्याला पाठींबा
"आपल्यात काड्या घालणारे लोक महायुतीत बसले आहेत, ते विचारतात की, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? मी या प्रश्नाचे उत्तर देतो की, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करा, माझा त्याला पाठींबा असेल" असे वक्तव्य करत शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांच्या प्रश्नांवर सडेतोड उत्तर दिलं आहे.
मुंबईत आज महाविकास आघाडीचा मेळावा सुरु असून त्यात मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त करत सत्ताधाऱ्यांच्या टीकेला उत्तरं दिली.

धार्मिक संपत्तीला हात लावू देणार नाही
उद्धव ठाकरे म्हणाले, "मी घोषणा करत आहे की वक्फ बोर्ड असो, मंदिर असो किंवा अन्य धार्मिक संपत्ती असो, मी त्या मालमत्तेला कोणत्याही किंमतीत हात लावू देणार नाही. हे माझे वचन आहे. हा प्रश्नच नाही.
Shivsena LIVE | महाविकास आघाडी पदाधिकारी मेळावा | षण्मुखानंद सभागृह, माटुंगा, मुंबई - LIVE https://t.co/Ki48uDkGRG
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) August 16, 2024
मी मुख्यमंत्रीपद याआधी सोडलंलं आहे
उद्धव ठाकरे म्हणाले, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा, माझा त्यांना पाठींबा राहील. मी माझ्यासाठी लढत नाही. मी ज्यावेळी मुख्यमंत्रीपद सोडलं. तेव्हाचं सर्वांच्या लक्षात आलं असेल की माझ्यासाठी लढत नाही, माझ्या महाराष्ट्रासाठी लढत आहे.
ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदासाठी हट्ट नाही
उद्धव ठाकरे म्हणाले, आजपर्यंत कुणाची हिंमत झाली नाही पुढेही होणार नाही, महाराष्ट्राला झोपवण्याची जो हिंंमत करतो त्याला आम्ही गाडून टाकतो ही आपल्या इतिहासाची पुनरावृत्ती पुन्हा करु. आज सर्व माध्यमांचे प्रतिनिधी येथे आहेत, करुन टाका जाहीर की कोण मुख्यमंत्री होणार असे म्हणत आपला मुख्यमंत्रीपदासाठी हट्ट नाही हे त्यांनी स्पष्ट केलं.
एकमेकांच्या जागा पाडण्याचं काम झालं
उद्धव ठाकरे म्हणाले, आम्ही बघू मुख्यमंत्री कोण होणार ते सत्ताधारी विचारत असेल तर विचारु द्या. पुढचा धोका सांगतो जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतला, त्या अनुभवाची पुनरावृत्ती आम्हाला नकोय. आम्ही युतीत एवढी वर्ष काढली जागावाटप, बैठका होत असायचे. बैठकांत ज्यांच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री असे धोरण ठरायचो, पण एकमेकांचे सीट पाडण्याचा प्रयत्न मुख्यमंत्रीपदासाठी केला जात होता.
आधी सीएम पदाचा उमेदवार ठरवा मग पुढे चला
उद्धव ठाकरे म्हणाले, पाडापाडीच्या राजकारणात युतीला काहीच महत्व राहीलं नाही. ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री हे समीकरण नको. आधी ठरवा मग पुढे चला हेच धोरण आपल्यासाठी महत्वाची आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारच्या योजनावर टीका केली. लाडक्या बहिणींना दीड हजार आणि योजना पोहचवणाऱ्यांना महिन्याला दहा हजार रुपये हे योजना पोहचवणारे दूत त्यांचेच लोक आहेत.
ही बातमी अपडेट होत आहे...












Click it and Unblock the Notifications