ट्रम्प भारताची थट्टा करताहेत, आपण गप्प का? ठाकरेंनी टॅरीफवरुन भाजपला धु-धु धुतलं! वाचा काय म्हणाले?
Uddhav Thackeray on PM Modi and BJP over US Donald Trump tariff dispute: डोनाल्ड ट्रम्प आपल्या देशाची खिल्ली आणि थट्टा उडवत आहेत, पण आपण त्यांना काहीही उत्तर देत नाही ना जाब विचारत आहोत. एका अक्षरानेही आपण उत्तर देऊ शकत नाही. म्हणजे देशाचे सरकार चालवतोय कोण? असा सवाल करत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला.
उद्धव ठाकरे इंडिया आघाडीच्या नियोजित कार्यक्रमासाठी दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी आज विविध मुद्द्यांसंदर्भात पत्रकार परिषद घेत सरकारला सवाल विचारले आहेत.

ट्रम्पंना आपण का उत्तर देऊ शकत नाही ?
ट्रम्प आपल्या देशाची खिल्ली आणि थट्टा उडवत आहेत, पण आपण त्यांना काहीही उत्तर देत नाही ना जाब विचारत आहोत. एका अक्षरानेही आपण उत्तर देऊ शकत नाही. म्हणजे देशाचे सरकार चालवतोय कोण? शिवसेनेचा वर्धापन दिन जेव्हा झाला त्यावेळी माझे मत व्यक्त केली होते की, देशाला पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री यांची गरज आहे पण सध्याचे पंतप्रधान गृहमंत्री हे भाजपचे आहेत, कारण ते प्रचारात जातात, पहलगाम हल्ल्यानंतर मोदीजी पंतप्रधान असते तर पहलगामला गेले असते, पण ते बिहारला सभेसाठी गेले. असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी पीएम मोदींसह इतर भाजप नेत्यांना दिला.
भाजपकडे परराष्ट्र नीतीचा अभाव
भाजप सरकार असाहय आहे, त्यांना कोणतीही परराष्ट्र निती नाही, त्यांची निती अपयशी ठरली आहे, धोरण नाही, अमेरिका तिकडे डोळे वटारत असताना पंतप्रधान चीनला जात आहे, असे म्हणतात पण मला खात्री नाही पण ते चीनचे दरवाजे केवळ मित्रांसाठी उघडण्यासाठी जात आहे की काय? यावर लक्ष द्यायला हवे, हे सरकार परराष्ट्र नितीमध्ये अपयशी ठरले आहे.
पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट सामन्यावरुन कठोर टीका
पाकिस्तान दुश्मन आहे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेही सांगायचे, आम्ही दिल्ली आणि मुंबईत सामना रोखला होता. जोपर्यंत दहशतवादी कारवाया पाकिस्तान थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवता कामा नये. सुषमा स्वराजही याबद्दल बोलल्या होत्या, पण हे (भाजप वरिष्ठ नेते) मतलबाचे बघतात. आपल्याला देशप्रमाचे धडे देतात आणि दुबईला पाकिस्तानसोबतचा क्रिकेट सामना पाहतात. हे सच्चे देशभक्त नाही, देशभक्तीची व्याख्या करायची असेल तर पाकिस्तान जोपर्यंत आपल्यासोबत दहशदवादी कारवाया थांबवत नाही तोपर्यंत पाकिस्तानसोबत कोणतेही संबंध ठेवू नये जो ठेवणार नाही तोच सच्चा देशभक्त आहे असे ठाकरे म्हणाले.
उपराष्ट्रपतींना का हटवले? ठाकरेंचा सवाल
उद्धव ठाकरेंनी दिल्लीत आज पत्रकार परिषदेत उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना तडकाफडकी का हटवले याचे उत्तर द्यायला हवे, असे म्हटले. महाराष्ट्रातल्या विषयावर बोलू दिले जात नाही. देशात अघोषित एनआरसी लागू झाला का असा सवालही ठाकरेंनी केला.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications