मोदी-शहांनी महाराष्ट्र लुटला; आता निर्लज्जपणे महाराष्ट्राची मते मागू लागलीत- उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Attack on Narendra Modi : नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीने महाराष्ट्र लुटला. महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवले. मी मुख्यमंत्री असताना यांची महाराष्ट्राकडे वळून पाहण्याची हिंमत देखील नव्हती. आता महाराष्ट्र लुटून हेच लोक पुन्हा मत मागण्यासाठी वणवण फिरू लागली आहेत, पण महाराष्ट्र यांना भीक घालणार नाही, असे म्हणत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार हल्लाबोल चढवला. मुलगी शिकली, प्रगती झाली आणि पंधराशे देऊन घरी बसवली, हा विकास आहे का? असा सवाल देखील त्यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना विचारला.
उद्धव ठाकरे यांची शनिवारी नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघात सभा झाली. या सभेत त्यांनी भाजप महायुतीवर विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

यांनी महाराष्ट्राचे उद्योग लुटून नेले
उद्धव ठाकरे म्हणाले की, नरेंद्र मोदी व अमित शहांना आता महाराष्ट्राची आठवण झाली आहे. आतापर्यंत त्यांना महाराष्ट्र केवळ लुटण्यासाठी आहे असे वाटत होते. पण आता महाराष्ट्रातील लोकांना मतदानाचा अधिकार आहे हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यानुसार आता ते इथे येऊन मतांचा जोगवा मागत आहेत. या लोकांनी महाराष्ट्राचे सर्व उद्योग लुटून गुजरातला नेले अन् आता निर्लज्जपणे महाराष्ट्राची मते मागता? तुम्हाला काय वाटते? तुम्ही काही केले तरी चालले आणि महाराष्ट्र केविलवाणेपणाने मत देईल? ही लढाई केवळ उद्धव ठाकरे व शिवसेनेची नाही. आपल्याला सत्ता पाहिजे. पण हे सर्व केवळ महाविकास आघाडीसाठी नाही तर येथील सर्वसामान्य जनतेसाठी आपल्याला सत्ता हवी आहे.
बोटे छाटलेल्या कार्यकर्त्याचा बदला घेणार
उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपने आता बटेंगे तो कटेंगे असा नारा दिला आहे. कोण कापणारे आहेत? जे काही कापणारे आहेत ते तुमच्यासोबत सत्तेत बसलेले आहेत. त्यांनी माझ्या एका कार्यकर्त्याचे केवळ फेसबुक पोस्ट टाकली म्हणून बोटे कापली. ज्यांनी माझ्या कार्यकर्त्याची बोटे कापली, त्यांना आम्ही आता राजकारणात कापणार आहोत, असे उद्धव ठाकरे यावेळी माजी खासदार तथा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांना इशारा देत म्हणाले. चिखलीकर यांच्यावर ठाकरे गटाच्या एका कार्यकर्त्याची बोटे छाटल्याचा आरोप आहे.
मोदी येथे आले तर त्यांना हा माझा बोटे कापलेला कार्यकर्ता दाखवा. त्यांना विचारा कोण आहे हा? काय त्याचा गुन्हा? विरोधात पोस्ट टाकली म्हणून त्याचे बोटे छाटता? त्याने तर पोस्ट टाकली, मी तर तुमच्याविरोधात उघडपणे बोलत आहे, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोटे छाटलेल्या पीडित कार्यकर्त्याला आपल्याजवळ बोलावले. तसेच त्याला त्याच्यावर बेतलेल्या प्रसंगाचा बदला मी स्वतः घेणार, असा धीरवजा शब्द त्याला दिला.
मी मुख्यमंत्री होतो तर यांची हिंमत नव्हती
मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्रातील एकही उद्योग का गुजरातला गेला नाही. भाजपच नव्हे तर मोदी - शहांचीही महाराष्ट्राकडे वाकडे पाहण्याची हिंमत नव्हती. कोरोना काळातही आम्ही हिंमतीने महाराष्ट्राचे उद्योग वाढवले. पण हे डोळ्यात सलत असल्यामुळे त्यांनी आमचे सरकार पाडले. त्यानंतर येथील सर्व उद्योग गुजरातला पळवले. आता ते आमच्यावर विकासाला खिळ घालण्याचा आरोप केला आहे. खरे तर त्यांनीच आमच्या तरुणांच्या रोजगाराला खिळ घालण्याचे काम केले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
जय शहांनी कधी क्रिकेट खेळलं का?
अमित शहा यांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा अगोदर जय शहा यांना क्रिकेटच्या बोर्डावरून खाली उतरवावे. जय शाह यांनी काय विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे का? सर्वात जास्त विकेट त्यांनी काढल्या आहेत का? जय शहाचे कर्तृत्व काय? त्यांच्यापेक्षा आमच्या गावाकडचा एखादा मुलगा जास्त चांगले क्रिकेट खेळतो.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications