बाजारबुणग्यांनी दैवतातही पैसे खाल्ले, भाजपचे गोमुत्रधारी हिंदूत्व आम्हाला मान्य नाही- उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray target to Narendra Modi, Amit Shaha : मी आज नागपूर शहरात आलो. नागपूर म्हटले की, संघाचे मुख्यालय. माझा सरसंघचालक मोहन भागवत यांना सवाल आहे की, त्यांना भाजपचे सद्याचे हिंदूत्व मान्य आहे का, कोणीही गुंड, भ्रष्टाचारी आणायचे अन् भाजपात समावेश करून घ्यायचे, ही भूमिका तुम्हाला मान्य आहे का, असा खडा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. ते नागपुरात बोलत होते. ठाकरे यांच्या हस्ते आज रामटेक मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी मालवण येथील शिवरायांचा कोसळलेल्या पुतळ्यावरुन मोदी शहांवर निशाणा साधला.

ठाकरे म्हणाले की, आज नागपुरात मला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे उद्घाटन करण्याचे भाग्य लाभले. शिवप्रेम शिकवावे लागत नाही. ते जन्माला आलेल्या प्रत्येक महाराष्ट्राच्या रक्तात आहे. परंतु, या दैवताच्या कामात देखील मोदी शहांच्या बाजारबुणग्यांनी पैसे खाल्लेत याचे खूप वाईट वाटते. लोकसभा जिंकायची म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी कोकणात आले. त्यांनी नौदल दिन साजरा केला. त्याचा अभिमान आहे. पण नौदलाचे आरमार ज्यांनी उभारले त्या शिवरायांच्या पुतळ्यात पैसे तुम्ही खाल्लात हे अतिशय वाईट गोष्ट आहे. महाराष्ट्र तुम्हाला कदापी माफ करणार नाही, असेही ते म्हणाले.
जात प्रमाणपत्र अवैध ठरवणाऱ्यांना शासन झालेच पाहिजे
बर्वे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ज्यांनी ठरवलं, त्यांच्यावर तर कारवाई केली पाहिजे, तेव्हा म्हणावे लागेल की, लोकशाही जिवंत आहे. मुंबईत काल सिनेट निवडणूक झाली. त्यात शिवसेनेला लोकांनी भरगोच्च मतदान केले. अभाविपच्या सर्व उमेदवारांना जेवढी मत मिळाली. तेवढी मत तर शिवसेनेच्या एका उमेदवाराला मिळाली आहे. त्यामुळे माझे आव्हान आहे की, मोदी शहांनी आता मैदानात येऊन आमच्याशी लढाई केली पाहिजे, शिवरायांच्या साक्षीने सांगतो की, मी सर्व लढाईसाठी सज्ज आहे, असे जाहीर आव्हान देखील उद्धव ठाकरे यांनी दिले.
महाराष्ट्र गिळायचा म्हणून यांना उद्धव ठाकरेंचा काटा
उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, अमित शहा हे अमित शहा नाहीत. ते अहमदशहा अब्दाल्ली आहेत. बंद दाराआड सांगतात की, उद्धव ठाकरेंना शरद पवारांना संपवा. माणसं फोडा. पण हे बाजारबुणगे आम्हाला काय शिवकणार आहेत. बाहेरुन येतात अन् आम्हाला शिकवतात. पण तुमची लायकी नाही. गोमुत्रधारी भाजपाचे हिंदूत्व आम्हाला मान्य नाही. युती तोडली त्याचे प्रमुख कारण आहे यांना महाराष्ट्र गिळायचा. म्हणून यांना शिवसेना नकोय. उद्वव ठाकरे नको, शरद पवार नकोय.
मोहन भागवतांना केला सवाल, तुम्हाला भाजपचं हिंदूत्व मान्य आहे का?
आम्ही म्हणजे मुनगंटीवार नाही. बोलतात काय, जातात कुठे, त्यांनी युती तोडली. 2019 साली आम्ही हिंदू होतो. मग मी कॉंग्रेससोबत गेलो तर म्हणे मी कॉंग्रेसवाला झाला आहे. भाजपचं हिंदूत्व आम्हाला मान्य नाही. मोहन भागवतांना माझा प्रश्न आहे. की भाजपचे हिंदूत्व तुम्हाला मान्य आहे का?, केवळ मौनव्रत बाळगणार आहात का, भाजपच्या या धोरणावर तुम्ही बोलणार आहात की नाही, असा सवाल देखील ठाकरे यांनी मोहन भागवत यांना केला.












Click it and Unblock the Notifications